पंधरा दिवसात उस्मानाबाद वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 26 June 2020

जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय व्हावे अशी सामान्य जनतेसह लोकप्रतिनिधींची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. त्याचा प्रस्ताव देखील राज्यशासनाकडे आला असुन त्यानुसार आवश्यक सर्व परवानग्या मिळालेल्या आहेत. येत्या पंधरवड्यात हा विषय मंत्रीमंडळाच्या बैठकीसमोर येणार असुन तिथे त्याला मंजुरी मिळाल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग मोकळा होणार आहे.

उस्मानाबाद : येत्या पंधरवाड्यात मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये उस्मानाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळेल असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यानी व्यक्त केला. ते जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते, त्यावेळी त्यानी याबाबत माहिती दिली.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
 

मंत्री देशमुख म्हणाले की, जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय व्हावे अशी सामान्य जनतेसह लोकप्रतिनिधींची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. त्याचा प्रस्ताव देखील राज्यशासनाकडे आला असुन त्यानुसार आवश्यक सर्व परवानग्या मिळालेल्या आहेत. येत्या पंधरवड्यात हा विषय मंत्रीमंडळाच्या बैठकीसमोर येणार असुन तिथे त्याला मंजुरी मिळाल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग मोकळा होणार आहे. याशिवाय जिल्ह्यामध्ये कोवीड टेस्टिंग सेंटरलाही मंजुरी दिली असुन काही दिवसातच ते केंद्र सूरु होणार असल्याचीही ग्वाही त्यानी यावेळी दिली. 

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर मृत्यू दडविल्याचा आरोप केला होता. त्यावर बोलताना श्री. देशमुख म्हणाले की, विरोधी पक्षनेते हे राजकीय आरोप करीत आहेत. आतापर्यंत पॉझीटिव्ह आलेल्या प्रत्येक रुग्णाची नोंद आयसीएमआरकडे असुन रुग्णाची माहिती दडविण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेत्याच्या आरोपाशी मी वैद्यकीय शिक्षणमंत्री म्हणुन अजिबात सहमत नाही. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्वांना सोबत घेऊन हे सरकार पारदर्शीपणे कारभार करीत असल्याचा दावा श्री. देशमुख यानी यावेळी केला.

ही पक्षिणी होते ‘होम क्वारंटाइन’ कशासाठी वाचा...!  

बाबा रामदेव यानी काढलेल्या औषधाबाबत बोलताना त्यानी वैद्यकीय क्षेत्रात ज्या संस्था त्याना परवानगी देतात त्यापैकी कोणतीही परवानगी या औषधाना दिलेली नाही. त्यामुळे नागरीकांना अशा औषधापासुन दुर राहण्याचे अवाहन त्यानी केले आहे. राज्यामध्ये या प्रकारच्या औषधाना विक्रीसाठी परवानगी असणार नाही हे गृहमंत्री अनिल देशमुख यानी यापुर्वीच सांगितले आहे. त्यामुळे त्याला अधिक महत्व देण्याची आवश्यकता नसल्याचेही श्री. देशमुख यानी सांगितले. 

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक   

सध्याच्या स्थितीला कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत असल्याचे दिसुन येत आहे. मुंबईमध्येही बरे होण्याची टक्केवारी वाढलेली आहे. जिल्ह्याच्या विचार केला तर बरे होण्याची टक्केवारी ३४ टक्केच्या पुढे गेली आहे, तर मृत्युचा दर चार टक्के असल्याची माहिती श्री. देशमुख यानी यावेळी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Recognition of Osmanabad Medical College