ब्रेकींग : जालना शहरातील ६९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जुलै 2020

जालना शहरातील विविध भागातील तब्बल ६९ संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे आत्तापर्यंत बाधित झालेल्यांचा आकडा आठशे झाला आहे. 

जालना : शहरात कोरोना विषाणूच्या संसर्गाची गती अधिक वाढली आहे. रविवारी ४७ जणांची वाढ झाल्यानंतर सोमवारी (ता.सहा) पुन्हा जालना शहरातील विविध भागातील तब्बल ६९ संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे आत्तापर्यंत बाधित झालेल्यांचा आकडा आठशे झाला आहे. 

जालन्यात वाढत्या रूग्णसंख्येमुळे सोमवारपासून दहा दिवसाचा कडक लॉकडाउन करण्यात आला आहे. कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी या काळात शहरातील प्रत्येक भागातील नागरिकांचे आरोग्य पथकाकडून सर्वेक्षण करण्यास सुरुवात झाली आहे. जालन्यात रूग्ण संख्या वाढली असली तरी अद्याप समूह संसर्ग झालेला नाही. सध्या बाधित आढळून येत असलेले रूग्ण एकाच कुटुंबातील आहे. मात्र, ही वाढती संख्या समुह संसर्गाला कारणीभूत ठरणारी आहे. जिल्हयात रविवारी दिवसभरात तब्बल ४७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात सर्वाधिक रूग्ण जालना शहरातील होते. तर आज पुन्हा शहरातील विविध भागातील ६९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

हेही वाचा : कोरोनाबाधिताच्या अंत्यविधीला तब्बल शंभर जण

यात बन्सीपुरा भागातील १४, मिशन हॉस्पिटलमधील चार, जेईएस कॉलेजमध्ये अलगीकरणातील दोन, नवीन बाजार, मंगळबाजार, संभाजीनगर, पोलास गल्ली येथील प्रत्येकी दोन, पेन्शनपुरा परिसरातील तीन, मोदीखाना भागातील पाच, कादराबादमधील चार, मस्तगडमधील तीन,दुर्गामाता रोड परसिरातील पाच, हॉटेल अंबर परिसर, चौधरीनगर, शाकड नगर, झाशीची राणी चौक परिसर, सहयोग नगर, नाथबाबा गल्ली, दुःखीनगर, कृष्णकुंज, हकीम मोहल्ला , गोपाळपुरा, लक्ष्मीनगर, सकलेचा नगर, श्रीनगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

बाधितांचा आकडा आठशेवर

घनसावंगी शहरातील गणपती गल्लीतील एक, बदनापूर येथील एक, अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील चार आणि जालना तालुक्यातील बाजीउमरद येथील एका रुग्णही बाधित आढळून आले आहे. जालना शहरात झपाट्याने वाढलेल्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा ८०० झाला असून त्यापैकी ४१६ रूग्ण बरे झाले आहे. सध्या ३५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आत्तापर्यंत २६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

हेही वाचा : आठवणींना जोडणारा लोखंडी पूल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reports of 69 people in Jalna positive