राज्यभरातील निवासी आश्रमशाळा एक डिसेंबरपासून होणार सुरू 

AASHRAM SHALA.jpg
AASHRAM SHALA.jpg

औरंगाबाद : राज्यातील आदिवासी विकास विभागातंर्गत शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा व एकलव्य निवासी शाळेतील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग एक डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. तसेच या विद्यार्थ्यांकरिता विभागातंर्गत असलेले शासकीय वसतिगृहे सुरु करण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे आदिवासी भागातील पालकांसह मूलांना देखील दिलासा मिळाला आहे. 

मागील आठ महिन्यांपासून आदिवासी विकास विभागातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बंद करण्यात आल्या होत्या. शैक्षणिक वर्ष प्रत्यक्षपणे सुरु नसले तरी ऑनलाईन, ऑफलाईनच्या माध्यमातून शिक्षण सुरु ठेवण्याचे आदेश शिक्षकांना देण्यात आले होते. तसेच स्थानिक परिस्थितीनुसार प्रत्यक्ष शाळा टप्प्या-टप्प्याने सुरु करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आला होता. 

राज्यात मिशन बिगेन अगेन अंतर्गत सर्व आस्थापना टप्प्या टण्याने सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत. त्याच धर्तीवर राज्यातील आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा व एकलव्य निवासी शाळांतील इयत्ता नववी ते बारावीसाठी शाळा सुरु करण्याच्या सूचना देखील जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार निवासी आश्रम शाळेतील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग एक डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. तसेच या विद्यार्थ्यांकरिता विभागाअंतर्गत असलेले शासकीय वसतिगृहे सुरु करण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे. शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य निवासी शाळा व शासकीय वसतिगृहे सुरु करण्यापूर्वी व सुरु झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छत्ता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबतच्या मार्गदर्शक सूचना विभागातर्फे देण्यात आल्या आहेत. 

निवासी शाळा सुरु करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना : 

  • शाळांची नियमित स्वच्छता, निर्जंतुकीकरण 
  • स्वच्छतेच्या प्रक्रियेत मुलांना सहभागी करु नये 
  • शाळेत हॅण्डवॉश, सॅनेटायझर, साबण, पाण्याची व्यवस्था 
  • विद्यार्थी, शिक्षकांची नियमित आरोग्य तपासणी 
  • बाधितांना डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच शाळेत प्रवेश 
  • सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एचआरसीटी तपासणी 
  • शाळेत आपत्कालीन गट, स्वच्छता गट स्थापन करणे 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com