प्रशासकांचे आवाहन : औरंगाबाद मनपातील अधिकारी-कर्मचारी सायकलवर आले कार्यालयात

Manpa aayukt.jpg
Manpa aayukt.jpg
Updated on: 

औरंगाबाद : पर्यावरण संवर्धन आणि इंधन बचतीसाठी महापालिका आयुक्तांनी एक दिवस सायकलने येण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या अवाहनाला प्रतिसाद देत मंगळवारी (ता. एक) बहुतांश अधिकारी व कर्मचारी महापालिकेत सायकलीने आले. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी एक दिवस सायकलवर कार्यालयात येऊन वर्क टू सायकल मोहिमेचा प्रारंभ महापालिका आयुक्‍तांनी केला होता. 

महापालिका प्रशासक तथा आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय यांनी ज्यांना शक्य आहे त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दर महिन्याच्या पहिल्या दिवशी त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी सायकलीचा वापर करून पर्यावरण संवर्धनास हातभार लावावा असे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत मंगळवारी सकाळी महापालिका अधिकारी-कर्मचारी सायकलवर बसून कार्यालयात पोचले.

यात प्रामुख्याने सहायक आयुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोंबे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, विद्युत विभागप्रमुख ए.बी. देशमुख यांचा समावेश होता. वाढती लोकसंख्या आणि त्यासोबतच वाहनांच्या वापरात वाढ झाली आहे. वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात इंधनाचा वापर होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस प्रदूषणातही वाढ होत आहे. या पृष्ठभूमीवर पर्यावरणाचे रक्षण आणि खनिज संपत्ती इंधन बचतीसाठी आयुक्‍त पांडेय स्मार्ट सिटीअंतर्गत लव औरंगाबादच्या माध्यमातून हा उपक्रम हाती घेतला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Aditya Thackeray and Ambadas Danve Visit to drought area in dharashiv district
dcm sunetra pawar visit to beed farmer agriculture loss
Ambajogai Thief Arrested
Tushar Kokani
Marathi News Esakal
www.esakal.com