रोहित पवार यांचा झालेला सत्कार नेत्यांची डोकेदुखी वाढवणार ? | Rohit Pawar And NCP | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rohit pawar

रोहित पवार यांचा झालेला सत्कार नेत्यांची डोकेदुखी वाढवणार ?

परंडा (जि.उस्मानाबाद) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आमदार रोहित पवार (Rohit Pawar) शनिवारी (ता.२१ ) एका कार्यक्रमांच्या निमित्ताने तालुक्यात (Paranda) आले होते. यात पक्षाच्या स्थानिक नेत्यांना महत्त्व देण्यात आले नाही. पक्षाचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांना कार्यक्रमात डावलण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा आरोप होता. त्यामुळे या कार्यक्रमास आमदार पवार यांनी उपस्थित राहू नये, असे स्थानिक पदाधिकाऱ्यांना वाटत होते. तसे प्रयत्न देखील काहींनी केले. राज्यात आमदार पवार यांची चांगली प्रतिमा आहे. राज्यभर त्यांचा चाहता वर्ग वाढत आहे. योग्य नियोजन व दिलेला शब्द पाळणारे, अशी त्यांची प्रतिमा असल्याने आमदार पवार कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. कार्यक्रमानंतर आमदार पवार यांचा शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला. (Rohit Pawar Presence Increase Anger Among Nationalist Congress Party Local Leaders In Paranda Taluka Of Osmanabad)

हेही वाचा: लता मंगेशकर यांच्या दीर्घायुष्यासाठी विद्यार्थी, प्राध्यापकांनी केली प्रार्थना

याच कार्यालयात काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) सत्ता उलथून टाकण्याची घोषणा शिवसेनेचे माजी आमदार पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन केली होती. त्यानंतर आमदार पवार यांनी भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. आगामी नगरपरिषदेची निवडणूक आमदार ठाकूर माजी आमदार पाटील एकत्र येऊन लढण्याची शक्यता आहे. स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी प्रमुख विरोधक असणाऱ्या नेत्यांच्या भेटी आमदार पवार यांनी घेतल्याचे शहरातील लोकप्रतिनिधी पदाधिकाऱ्यांना पटल्याचे दिसत नाही.अनेकानी या बाबतच्या प्रतिक्रिया समाज माध्यमावर व्यक्त केल्या आहेत. शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद आहे. नगरपरिषदेत पक्षाची एक हाती सत्ता होती. विरोधकांच्या भेटीमुळे दुखावलेले स्थानिक लोकप्रतिनिधी कार्यकर्ते नेत्यासाठी काही दिवस डोकेदुखी ठरणार आहेत.(Osmanabad)

टॅग्स :Rohit PawarOsmanabadNCP