पपईच्या बागेत  फिरविले ट्रॅक्टर

लक्ष्मीकांत मुळे
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

अर्धापूर (जिल्हा नांदेड ) ः गेल्या महिन्यात पडलेल्या पावसाने वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव झाला. याचा फटका अर्धापूर तालुक्यातील फळबागांनाही बसला. १५ दिवसांत माल बाजारपेठेत पाठविण्याचा विचार करत असतानाच परतीचा पाऊस, बदलते हवामान व विविध रोगांचा प्रादुर्भाव यामुळे पपईची बाग उध्दवस्त झाली व तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिसकावून घेतला. परिणामी, गजानन टेकाळे या शेतकऱ्याचे स्वप्न उद्ध्वस्त झाले.

    अर्धापूर तालुक्यातील दाभड येथील गजानन टेकाळे यांच्या शेतातील पपई बागेचे प्रचंड नुकसान झाले असून झाडाला चांगले फळ लागलेले असताना ऑक्टोबरमध्ये सततच्या पावसाच्या माऱ्याने पपई पिकांचे अतोनात नुकसान झाले. दाभड येथील गजानन परसराम टेकाळे यांनी आपल्या शेतामध्ये तैयवान ७८६ जातीच्या पपई पिकाची लागवड दोन एकर क्षेत्रामध्ये केली. झाडे चांगली वाढली पण उन्हाळ्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई असताना त्यांनी टँकरच्या साह्याने पपईच्या बागेला पाणी देत बाग जगवली. शेती हेच आमच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. शेतीमध्ये नवीन प्रयोग करत पपई पीक घ्यावे या उद्देशाने व कमी खर्चात जास्त नफा मिळतो या हेतुने शेतात पपई पिकाची लागवड केली व तळहातावरील फोडाप्रमाणे काळजी घेतली.

दुष्काळात योग्य नियोजन करत बाग टिकवून ठेवली. दोन एकर शेतात अंदाजे दोन लाख रूपये खर्च करत आजपर्यंत बाग टिकवली. गेल्या महिन्यात पडलेल्या पावसाने वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव झाला. होत्याचे नव्हते झाले १५ दिवसांत माल बाजारपेठेत पाठविण्याचा विचार करत असतानाच परतीच्या पाऊस बदलते हवामान व विविध रोगांचा प्रादुर्भाव यामुळे सर्व बाग उध्दवस्त झाली व तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिसकावून घेतल्याने गजानन यांचे स्वप्न उद्ध्वस्त झाले.

बागेतील ७५ टक्के फळ रोगग्रस्त

अस्मानी संकट व रोगांचा प्रादुर्भावला कंटाळून त्यांनी बाग तोडण्याचा निर्णय घेतला. बागेतील झाडे तोडली अन् उभ्या झाडावर ट्रॅक्टर घातले. बागेसाठी अात्तापर्यंत दीड ते दोन लाखांचा खर्च केला. सध्या बागेतील ७५ टक्के फळ रोगग्रस्त झाली. बागेतील झाडे तोडली अन् उभ्या झाडावर ट्रॅक्टर घातले.

पपई बागेसाठी दोन लाख रूपये खर्च आला चांगला नफा मिळेल या आशेने पपईची लागवड केली. शेतातील केलेला खर्च निघत नाही, शासनाच्या वतीने मदत मिळावी. -गजानन टेकाळे, शेतकरी. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rotated tractor in the papaya garden