स्कूल बसचालकांवर कारवाई का नाही... 

अनिल जमधडे
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

औरंगाबाद : परिवहन कार्यालयाने स्कुल बसविरोधात कारवाई करण्याचा इशारा दिलेला आहे. मात्र औरंगाबाद आरटीओ कार्यालय थेट कारवाई करण्याऐवजी स्कुल बसचालकांना कारवाईचा इशारा देत आहे. या भूमिकेने मात्र उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. 

राज्यभरातील शालेय स्कूल बस, स्कूलव्हॅन, ऑटोरिक्षा तसेच इतर वाहनाद्वारे होणारी शालेय विद्यार्थ्याची वाहतूक ही मोटार वाहन कायद्याच्या नियमावलीचे पालन न करता होत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत. त्यामुळेच परिवहन आयुक्तांनी पंधरा दिवसांपूर्वी राज्यभर स्कुल बस तपासणी मोहिम राबवण्याचे आदेश दिले होते. 

हेही वाचा : पत्नी सोबच्या संबंधाचे भूत

कारवाई गुलदस्त्यात 

स्कूल बस आणि शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या अन्य वाहनांना प्रत्येक वर्षी तपासणी करुन योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टीफिकेट) घेणे बंधनकारक आहे. योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांच्या विरोधात मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेश परिवहन विभागाने राज्यातील प्रत्येक आरटीओ कार्यालयांना दिले होते. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात स्कुल बसच्या विरोधात कारवाई करण्यात आली, मात्र औरंगाबाद जिल्ह्यात कारवाई झाली किंवा नाही याबाबत आरटीओ कार्यालय सांगण्यास तयार नाही. परिवहन विभागाने थेट कारवाई करण्याचे आदेश दिले असतानाही औरंगाबाद परिवहन कार्यालयाने मात्र केवळ इशारा दिला आहे. 

काय आहे इशारा? 

जिल्हयातील सर्व शाळा व्यवस्थापनांनी व विद्यार्थ्याच्या पालकांनी शालेय विद्यार्थ्याची वाहतूक ही कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थी वाहतूक परवाना नसलेल्या व कायदा आणि नियमाची पुर्तता न करणाऱ्या वाहनातून करण्यात येऊ नये. असे केल्यास संबधित वाहन मालक व चालकांवर मोटार वाहन कायद्यातर्गत कारवाई केली जाईल असा इशारा आरटीओ कार्यालयाने दिला आहे. राज्यभर स्कुल बसच्या विरोधात कारवाई सुरु असताना, औरंगाबाद आरटीओ कार्यालय मात्र केवळ इशारा देत आहे. 

येथे क्‍लिक करा : अबब : प्रतिष्ठीत व्यक्ती कुंटनखान्याचे ग्राहक
 
शाळेवरही कारवाई 

बेकायदेशीर वाहनातून शालेय विद्यार्थ्याची वाहतूक करतांना निदर्शनास आलेल्या शाळा व्यवस्थापपनावर सुध्दा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे या पुढे अशा बेकायदेशीर वाहनातून शालेय विद्यार्थ्याची वाहतूक होणार नाही याची पालकांनी आणि शाळा व्यवस्थापनाने खबरदारी घ्यावी अन्यत: कायदेशीर कारवाईला समोरे जावे असा इशारा आरटीओनी दिला आहे. 

थेट कारवाई का नाही? 

स्कुल बसला प्रत्येक वर्षी आरटीओ कार्यालयात तपासणी करुन योग्यता प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. यासाठी प्रत्येक वर्षी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आरटीओ कार्यालयातर्फे विशेष मोहिम हाती घेतली जाते. तरीही स्कुल बसचालक बस तपासणीसाठी आणत नाही, उलट उन्हाळ्याच्या दिवसात सर्रास विवाह समारंभासाठी स्कुल बस भाड्याने दिल्या जाते. त्यामुळे वारंवार आवाहन करुनही स्कुल बसचालक तपासणी करुन घेत नाही, तर त्यांना पुन्हा इशारा देण्याऐवजी थेट कारवाई का केली जात नाही असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rto school bus news