कोरोना रोखण्यासाठी गावच्या रस्त्यावर काट्याकुपाट्या 

उमेश वाघमारे 
मंगळवार, 24 मार्च 2020

 बदनापूर तालुक्यातील उज्जैनपुरी येथील ग्रामस्थांनी कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये म्हणून  गाव बंदीचा ठराव एकमताने पारित केला. गावात एकही नवीन व्यक्ती येणार नाही व गावातून एक ही व्यक्ती बाहेर जाणार नाही. यासाठी गावकऱ्यांनी गावाला जोडल्या जाणाऱ्या सर्व रस्त्यात काट्या टाकून हे रस्ते बंद केले आहे.

जालना -  कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नाही म्हणून जालना जिल्ह्यतील बदनापूर तालुक्यातील गावकऱ्यांचा गावात नवीन व्यक्तीला प्रवेश बंदी करत रस्त्यावर काटेरी फांद्या टाकल्यात. त्यामुळे नवीन व्यक्तीला गावात प्रवेश  बंदी केली आहे. 

महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्ये वाढू लागली आहे. त्यामुळे राज्यासह देशात लॉकडाऊनचा केंद्र शासनाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरातील नागरिक आता खेड्याकडे वळू लागले आहेत. या मुळे ग्रामीण भागात ही ग्रामस्थांना  कोरोनाची धास्ती निर्माण झाली आहे. परिणामी शहरातून येणाऱ्या नागरिकांना थेट गावात प्रवेश देण्यासाठी आता ग्रामीण भागात ही धास्ती घेतली जात आहे.

हेही वाचा :  रिकामचोटांच्या पार्श्‍वभागावर बसतायत फटके

जालना जिल्ह्यातील  बदनापूर तालुक्यातील उज्जैनपुरी येथील ग्रामस्थांनी कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये म्हणून  गाव बंदीचा ठराव एकमताने पारित केला. गावात एकही नवीन व्यक्ती येणार नाही व गावातून एक ही व्यक्ती बाहेर जाणार नाही. यासाठी गावकऱ्यांनी गावाला जोडल्या जाणाऱ्या सर्व रस्त्यात काट्या टाकून हे रस्ते बंद केले आहे.

हेही वाचा : जालना जिल्ह्यात ३२ चेकपोस्ट

ग्रामपंचायत कार्यालयात सर्व गावकऱ्यांच्या संमतीने हा ग्रामसभेत ठराव पारित करण्यात आला आहे. जोपर्यंत कोरोना विषाणूचा संसर्ग थांबत नाही तोपर्यंत गाव बंदीचा निर्णय उज्जैनपुरी येथील   गावकऱ्यांनी घेतला आहे.

३१६ जणांना होम क्वारंटाईन 

अंकुशनगर -  वडीगोद्री आरोग्य केंद्रांतर्गत महानगरांसह शहरी भागातून परिसरात आलेल्या ३१६ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. शहरी भागातून आलेल्यांची नावे नोंद करण्यात आली आहेत. या ३१६ जणांचे संस्थात्मक तसेच घर विलगीकरण करण्यात आले आहे. त्यांना विलगीकरणाचा शिक्का मारला आहे. त्यांनी नियम पाळावेत, खोलीतच राहावे, अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये, स्वच्छता ठेवा, वारंवार हात धुवावा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, सर्दी थंडी ताप खोकला झाला आल्यास लगेच आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा, कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही, नियम पाळावेत, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशील जावळे यांनी सांगितले. दरम्यान, वडीगोद्री, शहागड परिसरातील जिल्हा सीमा बंदी करण्यात आली, असून त्या सर्व ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा सीमा हद्दीतून वाहने तपासणी करूनच पाठवली जात आहे, असे पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वारे यांनी सांगितले आहे. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rural road block in Badnapur