
मतदारांचा अनादर शिवसेनेने केला असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिवसेनेच्या विधानसभा निवडणुक फिक्सींगबाबत सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
निलंगा (जि.लातूर) : लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेला सोडण्यात आलेली जागा मुंबई शहराच्या जागेच्या बदल्यात 'फिक्सींग' झाली होती, असा आरोप माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी मंगळवारी (ता.२६) केला. शिवाय विधानसभा निवडणुकीत 'नोटा' दोन नंबरवरती राहिला असा उल्लेखही त्यांनी याप्रसंगी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
आनंदवाडी-गौर (ता.निलंगा) येथे एका विकास कामाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर हा गौप्यस्फोट केला. विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी देत असताना व जागा वाटप करत असताना शिवसेना व भाजपमध्ये महाराष्ट्रातील काही जागा वाटपात रस्सीखेच सुरू होती. त्यातच लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी ही जागा शिवसेनेने स्वतःकडे सोडवून घेतली. मीडियात त्यावेळी मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.
पंकजा मुंडेंच्या यशस्वी मध्यस्थीनंतर शेतकऱ्यांचे उपोषण मागे, प्रशासनाला दिल्या कारवाईच्या सूचना
शिवाय या मतदारसंघांमध्ये उमेदवार पसंत नसल्यामुळे भाजप-शिवसेना युती असतानाही त्या मतदारसंघातील मतदारांनी नोटा या चिन्हासमोर मतदान करून नाराजी मोठ्या प्रमाणात व्यक्त केली होती.प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आनंदवाडी-गौर येथे विकास कामाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी माजी पालकमंत्री यांनी कार्यक्रमापूर्वी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांबाबत उत्तर देताना म्हणाले की, लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेने मुंबई येथील एका जागेसाठी फिक्सींग केली होती. तेथे दोन नंबरवरती 'नोटा' राहिले.
त्यामुळे मतदारांचा अनादर शिवसेनेने केला असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिवसेनेच्या विधानसभा निवडणुक फिक्सींगबाबत सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. शिवाय आनंदवाडी-गौर येथे विकास कामे लोकार्पणप्रसंगी संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की, निलंगा शहरामध्ये आता नळाला २४ तास नागरिकांना पाणी मिळणार आहे. लातूर येथे प्रस्थापित नेतृत्व असतानाही रेल्वेने पाणी आणण्याची वेळ लातूरकरांवर आली. येत्या काळात लातूर शहरासाठी उजनी प्रकल्पातून पाणी आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शिवाय निलंगा विधानसभा मतदारसंघाला भविष्यात विकास निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
Edited - Ganesh Pitekar