'मृत्यूच्या आकड्यांची लपवाछपवी, लवकरच भांडाभोड करणार'

जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात प्रशासनाला अपयश आल्याचेही निलंगेकर म्हणाले
sambhaji patil nilangekar
sambhaji patil nilangekarsambhaji patil nilangekar

लातूर: पहिल्या लाटेसोबत जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्र्यांनी दुसरी लाटही गांभीर्याने घेतलेली नाही. यामुळे दुसऱ्या लाटेत कोरोनामुळे (covid 19 deaths in latur) मोठ्या संख्येने लोक मृत्यू पावले असताना मृत्यूचे खरे आकडे लपवले जात आहेत. ही गंभीर बाब असून, आम्ही याचा लवकरच भांडाफोड करणार आहोत. मृत्यू पावलेल्या लोकांची खरी आकडेवारी आमच्याकडे आहे. समोरासमोर आल्यास आम्ही ही आकडेवारी पुराव्यानिशी तयार आहोत, अशी माहिती माजीमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर (sambhaji patil nilangekar) यांनी गुरूवारी (ता. २७) पत्रकारांशी बोलताना दिली.

sambhaji patil nilangekar
दिलासादायक! मराठवाड्यातील रुग्णवाढ दोन हजारांच्या आत

जिल्ह्यात म्युकर मायकोसीस रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यासाठी श्री. निलंगेकर हे भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेशअप्पा कराड, युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर, नगरसेवक अॅड. शैलेश गोजमगुंडे व पदाधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. याच दरम्यान पालकमंत्री अमित देशमुख यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरू होती. निवेदन देण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. पालकमंत्री सांगत नाहीत तोपर्यंत हलणार नाही, अशीच भूमिका प्रशासन घेत आहे.

पालकमंत्र्यांकडून सांगितले जाणारे मृत्यूचे आकडे चुकीचे असून खरे आकडे आमच्याकडे आहेत. हे आकडे लपवून सरकारला महात्मा फुले आरोग्य योजनेच्या खर्चात बचत करायची आहे. कोरोनातून बरे झालेल्या, कोरोनाग्रस्त मधुमेही रूग्ण, रेमडेसिव्हिर इंजेक्शन, ऑक्सिजन व मोठे उपचार घेतलेल्यांना म्युकर मायकोसिस आजाचा धोका होत आहे. जिल्ह्यात या आजाराचे सध्या मोठे रूग्ण असून, या आजारावरील उपचार सामान्यांना परवडणारे नाहीत. यामुळे या आजाराचा संभाव्य धोका असलेल्या रुग्णांचा शोध गाव पातळीवरील यंत्रणेकडून घ्यावा व रुग्णांना लक्षणे दिसून येताच तातडीने उपचार मिळवून द्यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याचेही श्री. निलंगेकर यांनी या वेळी सांगितले. आमदार कराड यांनीही कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची खरी आकडेवारी लपवली जात असल्याचा आरोप केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com