उस्मानाबादेत एकाच शाळेतील वीस शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह!

तानाजी जाधवर
Friday, 20 November 2020

उस्मानाबाद जिल्ह्यात दिवसभरात 87 रुग्णांची वाढ झाली असून सध्या शाळा सुरु करण्याआधी शिक्षकांना कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आलेली आहे. त्यामुळे उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यातही कोरोना चाचणी सुरु आहे. शहरातील सर्वात मोठी संस्था असलेल्या श्रीपतराव भोसले हायस्कूल या शाळेमधील तब्बल वीस शिक्षकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शिक्षकवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये शुक्रवारी रुग्णांची संख्या वाढली आहे. दिवसभरामध्ये 87 रुग्णांची वाढ झाली असुन 25 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सुदैवाने गेल्या चार ते पाच दिवसामध्ये मृत्युची घटना घडलेली नाही. त्यामुळे रिकव्हरी रेट वाढत असून मृत्यूचा दर काही अंशानी कमी होत असल्याचे चित्र आहे. ज्या प्रमाणात मृत्युचा दर खाली यायला हवा होता. त्या प्रमाणात तो अजुनही खाली आलेला नाही. साहजीकच जिल्ह्यावरील कोरोना संकट काही टळलेले नाही.

 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

जिल्ह्यामध्ये आजपर्यंत एकुण 14 हजार 618 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.66 टक्के इतके झाले आहे. तर मृत्यूचा दर अजूनही 3.61 टक्के एवढाच आहे. जिल्ह्यामध्ये मृत्यू होत नसले तरी इतर जिल्ह्यात झालेल्या मृत्यूची नोंद जिल्ह्याच्या पोर्टलवर होत असल्याने हा दर वाढत असल्याचे दिसुन येत आहे. असे असले तरी जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे. शुक्रवारी अँटिजेन टेस्टची संख्या वाढली असुन तरीही त्यातुन पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या तुलनेने कमीच असल्याची दिलासादायक बाबही महत्वाची आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दोन हजार 117 इतक्या अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या त्यातुन 27 जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे चित्र आहे. मात्र 388 जणांचे स्वॅब चाचणी करण्यात आली होती. त्यातील तब्बल 56 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने काहीप्रमाणात रुग्णसंख्या वाढल्याचे दिसुन येत आहे. इतर जिल्ह्यामध्ये चार जणांना कोरोनाची लागन झाल्याची नोंद आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

एकुण 87 रुग्णापैकी उस्मानाबाद मध्ये 41 जणांना कोरोनाची लागन झाली आहे. त्यातही आरटीपीसीआरद्वारे 29 तर 12 जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. तुळजापुर 13 , उमरगा 11, कळंब नऊ, परंडा सहा, वाशी तीन, भुम दोन, लोहारा दोन अशी तालुकानिहाय वाढलेल्या रुग्णांची संख्या आहे.

या शाळेतील शिक्षकांना कोरोनाची लागण

उस्मानाबाद शहरातील अत्यंत मोठी व प्रसिध्द असलेली श्रीपतराव भोसले हायस्कूल या शाळेमधील 20 जणांना कोरोनाची लागन झाली आहे. तसेच शिंगोली येथील आश्रमशाळा येथील एक, विद्यानिकेतन आश्रमशाळा येथील एक जण, सरस्वती हायस्कुल बेंबळी एक, तेरणा हायस्कुल तेर, एक, घोगरे हायस्कुल एक अशा विविध शाळामधील शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागन झाल्याची नोंद आहे. 

उस्मानाबाद कोरोना मीटर 

  • एकुण रुग्णसंख्या- 15442
  • बरे झालेले रुग्ण - 14618
  • उपचाराखालील रुग्ण- 266
  • एकुण मृत्यु - 558
  • आजचे बाधित - 87
  • आजचे मृत्यु - 00

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: same school twenty teachers corona positive osamanabad news