राखीव पोलिस दलाच्या दहा जणांचे घेतले नमुने 

उमेश वाघमारे 
Friday, 17 April 2020

मुंबई येथून रेड झोनमधून बंदोबस्त करून परतलेल्या राज्य राखीव पोलिस दलाच्या दहा जवानांचे कोरोना तपासणीसाठी शुक्रवारी (ता. १७) नमुने घेण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे.

जालना - मुंबई येथून रेड झोनमधून बंदोबस्त करून परतलेल्या राज्य राखीव पोलिस दलाच्या दहा जवानांचे कोरोना तपासणीसाठी शुक्रवारी (ता. १७) नमुने घेण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे.

मुंबईच्या बंदोबस्तातून परतलेल्या सुमारे ११० जवानांची आरोग्य तपासणी करून त्यांना पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर बीड येथे बंदोबस्ताकमी गेलेल्या ‘एसआरपीएफ’च्या १०४ जवानांची तपासणी करून १०० जवानांना डिस्चार्ज दिला आहे. तर चार जवान इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन करण्यात आले आहे. 

हेही वाचा : जालन्याच्या इतिहासात प्रथमच स्टील उद्योग बंद

जालना येथील ‘एसआरपीएफ’ची एक तुकडी ही मुंबई येथे बंदोबस्ताकामी गेली होती. ही १२० जवानांची तुकडी शुक्रवारी (ता. १७) बंदोबस्त पूर्ण करून जालन्यात आली. त्यानंतर त्या जवानांची जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली. या कंपनीला दहा जवानांना सर्दी, खोकल्याचा त्रास असल्याने त्यांचे कोरोना तपासणीसाठी नमुने घेण्यात आले. त्यांना सामान्य रुग्णालय येथे दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे. तर उर्वरित जवानांना पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन करण्यात आले आहे.

हेही वाचा : नवऱ्याला भांडून गेली, कोरोनाला सापडली

दरम्यान, बीड जिल्ह्यात बंदोबस्ताकामी गेलेली १०४ जवानांची तुकडी ही जालन्यात दाखल झाली आहे. त्यातील चार जवानांचे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर इतर १०० जवानांची आरोग्य तपासणी करून डिस्चार्ज देण्यात आल्याचे डॉ. राठोड व पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Samples taken of ten reserve police