esakal | 'देह जावो अथवा राहो' या अभंगातून प्राणांतिक उपोषणाची घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay jadhav

'देह जावो अथवा राहो' या अभंगातून अमरण उपोषणाची घोषणा- खासदार जाधव

sakal_logo
By
टीम ई सकाळ

परभणी : देह जावो अथवा राहो, पांडूरंगी दृढ भावो या अभंगातून खासदार संजय जाधव यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी निकराची लढाई सुरु झाल्याचे संकेत दिले असून ता. सात सप्टेंबरपासून प्राणांतिक उपोषण सुरु करण्याची घोषणा केली. शुक्रवारी या आंदोलनात संत, महंत, वारकरी सांप्रादाय, लोककलावंत व खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आंदोलनाला पाठींबा दर्शवला.

हेही वाचा: उस्मानाबाद: 'ई-पीक' पाहणी शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'आम्ही परभणीकर' या हॅशटॅग खाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास शासनाने मंजुरी द्यावी या मागणीसाठी ता. एक सप्टेंबर पासून सर्वपक्षीय आंदोलन सुरु झाले आहे. शुक्रवारी (ता.तीन) या आंदोलनात जिल्ह्यातील संत, महंत, विविध वारकरी संस्थांचे वारकरी, लोककलावंत, खेळाडू, क्रीडा संघटक उतरले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला साक्षीला ठेवून होणाऱ्या आंदोलनात वयोजेष्ठांपासून बाल चिमुकले संत, महंत, वारकरी, पोतराज, वासुदेव,

हलगीवाले, गोंधळ कलावंत यांच्यासह शेकडो खेळाडू उत्साहात सहभागी झाले होते. किर्तन, भजन, भारुड, गवळण या पारंपारिक कलांचे या कलावंतांनी सादरीकरण केले. तर जिम्नॅस्टीक, ढाल-तलवारी, लाठ्या-काठ्या, स्केटींगची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करुन बाल-चिमुकल्या खेळाडूंनी लक्ष वेधले. सर्वांचा एकच नारा होता, परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झालेच पाहिजे.

हेही वाचा: परळीत वैद्यनाथ अर्बन बँकचा अधिकारी ताब्यात

तत्पुवी हे लोककलावंत, खेळाडू वाजत गाजत, पारिपांरिक कला सादर करीत आंदोलन स्थळी आहे. नंतर तेथील व्यासपीठावर देखील त्यांनी आपल्या कला सादर केल्या. खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, लोकनेते विजय वाकोडे यांच्यासह विविध पक्षांच्या नेतेमंडळी देखील आंदोलनस्थळी उपस्थित होती.

मेडीकलसाठी निकराची लढाई सुरु

आम्ही परभणीकर म्हणून सर्वपक्षीय नेत्यांसह जिल्ह्यातील युवक, महिला, व्यापारी, उद्योजक, वैद्यकीय, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्राच्या सहभागाने सुरु असलेली लढाई आता निकराच्या व हातघाईच्या टप्प्यावर आली आहे. यावेळी खासदार संजय जाधव यांनी संत नामदेव महाराजांचा 'देह जावो अथवा राहो । पांडुरंगी दृढ भावो ॥, चरण न सोडी सर्वथा । आण तुझी पंढरीनाथा ॥ हा अभंग गावून आपल्या भावना तर व्यक्त केल्या. त्याचबरोबर निकराची लढाई सुरु झाल्याचे संकेत देखील दिले.

जो पर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा होणार नाही, तो पर्यंत हा लढा आता सुरुच राहणार असे सांगून आपण ता. सात सप्टेंबर पासून प्राणांतिक उपोषण सुरु करणार असल्याचे जाहिर केले. आंदोलनस्थळी येणाऱ्या प्रत्येकाची संयोजन समितीने चोख व्यवस्था ठेवल्याचे दिसून आले. बसण्यासाठी खुर्ची, जागेवरच पिण्याचे बाटलीबंद पाणी तसेच नाष्ट्यांची व्यवस्था देखील करण्यात आली होती. शुक्रवारी एकादशी असल्यामुळे सर्वांच्या फराळाची व्यवस्था देखील करण्यात आली होती.

loading image
go to top