Santosh Deshmukh Case: देशमुखांची हत्या करतानाचे 15 व्हिडीओ, 8 फोटो; प्रत्येक व्हिडीओचा तपशील आला समोर, मिनिट टू मिनिट माहिती

Walmik Karad sudarshan ghule: पंधरा व्हिडीओंमध्ये नेमकं काय घडतंय, त्याची माहिती चार्जशीटमध्ये देण्यात आलेली आहे. संतोष देशमुख यांना किती क्रूर पद्धतीने संपवलं, हे यातून दिसून येत आहे.
Exclusive crime scene footage: 15 videos and 8 images reveal critical evidence in the Santosh Deshmukh murder case.
Exclusive crime scene footage: 15 videos and 8 images reveal critical evidence in the Santosh Deshmukh murder case.esakal
Updated on

Beed Crime News: संतोष देशमुख यांना कशा पद्धतीने मारलं याचे फोटो मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पुढे आले होते. चार्जशीटमधील फोटोंमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता दोषारोपपत्रातील आणखी माहिती पुढे आलेली आहे. १५ व्हिडीओ आणि ८ फोटोंचा तपशील स्पष्ट झालाय. या व्हिडीओज्मध्ये नेमकं काय आहे, याचा सविस्तर डेटा चार्जशीटमध्ये आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी महेश केदारने स्वतःच्या मोबाईलमध्ये देशमुख यांना मारहाण करताना तब्बल 15 व्हिडिओ आणि 8 फोटो घेतले होते

- मिनिट टू मिनिटचे अपडेट

- दि. 9 डिसेंबर रोजी 3 वाजून 46 मिनिटांनी संतोष देशमुख यांना मारहाणीला सुरुवात झाल्याचा पाहिला व्हिडीओ आहे. तर शेवटचा व्हिडिओ हा 5 वाजून 53 मिनिटांचा आहे. ज्यामध्ये संतोष देशमुख यांचा विव्हळताना एकदम लहान आवाज येत आहे.

तब्बल दोन तास आरोपी संतोष देशमुख यांना मारहाण करीत होते, सोबतच व्हिडिओही काढत होते. फोटो आणि व्हिडिओसंदर्भातील डिटेल्स रिपोर्ट 'साम टीव्ही'च्या हाती लागला आहे.

कोणत्या व्हिडीओमध्ये काय चित्रित झालं?

  • व्हिडिओ क्र.1

- 9 डिसेंबर रोजी 15.46.06 (3 वाजून 46 मिनिटांनी मारहाणीला सुरुवात केली)

- महेश केदारच्या मोबाईलमधील पहिला व्हिडिओ (VID20241209154453) हा तब्बल १ मिनिटे १० सेकंदांचा आहे. 171 MB फाईलची साईज आहे.

व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांना पांढऱ्या रंगाच्या पाईप आणि वायरसारख्या हत्याराने तसेच लाथा बुक्क्याने मारहाण केली जात आहे.

  • व्हिडीओ क्र. 2

वेळ - 15.47.02 - 53 सेकंदांचा हा व्हिडीओ असून 128 MB या साईजची फाईल आहे. व्हिडीओमध्ये संतोष देशमुख यांना शिवीगाळ करून मारहाण केली जात आहे. यातही पांढऱ्या रंगाचा पाईप आणि वायरने मारहाण करत संतोष देशमुख यांची पॅन्ट काढली जात आहे.

  • व्हिडीओ क्र. 3

वेळ - 15.48.00- 35 सेकंदांचा या व्हिडीओ फाईलची साईज 86.9 एमबी आहे. या व्हिडीओमध्ये संतोष देशमुख यांना बुटाच्या सहाय्याने मारहाण केली जात आहे. तर दुसरा आरोपी हातात वायरसारखे हत्यार घेऊन पाठीमागे लावलेल्या मुठीने मारहाण करत आहे.

  • व्हिडीओ क्र. 4

15.51.43 (3 वाजून 51 मिनिट 43 सेकंद) हा व्हिडीओ 2.04 (दोन मिनिट चार सेकंद) फाईल साईज 300 MB इतकी आहे.

व्हिडीओमध्ये शिवीगाळ करून लवचिक पाईपने मारहाण करताना आरोपी शूटिंग करत आहेत. शूटिंग करणारा महेश केदार असल्याचे दिसत आहे. याच व्हिडिओमध्ये सुदर्शन घुलेची गाडी देखील दिसत आहे.

  • व्हिडिओ क्र. 5

15.52.26 (तीन वाजून 52 मिनिट २६ सेकंद) 7 सेकंद

या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करुन त्यांना कॉलरला धरुन उठवून बसवताना दिसत आहे.

  • व्हिडिओ क्रमांक. 6

वेळ 15.53.59 (3 वाजून 53 मिनिट 59 सेकंद) 87 mb ची फाईल असून 36 सेकंदांचा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये संतोष देशमुख यांना तोंडावर तसेच इतर ठिकाणी मारहाण झालेली दिसत आहे.

  • व्हिडिओ क्रमांक 7

वेळ 15.54.22 (३ वाजून ५४ मिनिट २२ सेकंद) 35MB साईजची ही फाईल आहे. 14 सेकंदांचा हा व्हिडीओ असून यामध्ये तपकिरी रंगाच्या पाईपने मारहाण करताना मोबाईलमध्ये शूट करताना एक व्यक्तीचा हात दिसत आहे.

  • व्हिडिओ क्रमांक.8

वेळ - 15.54.32 (३ वाजून ५४ मिनिट ३२ सेकंद) 10 mb साईजची ही फाईल असून 4 सेकंदांचा व्हिडीओ आहे. या व्हिडिओमध्ये आरोपी हे संतोष देशमुख यांना बळजबरीने काहीतरी विचारत आहेत.

  • व्हिडिओ क्र.9

वेळ 15.55.27 (3 वाजून 55 मिनिटं 27 सेकंद) 127MB साईजची ही फाईल असून 52 सेकंदांचा व्हिडीओ आहे.

या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांना तोंडावर तसेच इतर ठिकाणी मारहाण झालेली आहे. तसेच सुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे, असं म्हणायला लावून खाली पाडून जखमीच्या तोंडावर उभ्याने लघवी करताना दिसत आहे.

  • व्हिडिओ क्रमांक.10

वेळ- (15.58.56) 2 सेकंदाचा व्हिडिओ आहे. व्हिडीओमध्ये संतोष देशमुख यांच्या अंगावरील सर्व कपडे काढून अंडरवेयरवर बसवून पाईपने मारहाण केली जात आहे. दुसरा व्यक्ती शूटिंग करत आहे.

  • व्हिडिओ क्रमांक.11

वेळ - 15.58.56, 5 सेकंदांचा हा व्हिडीओ आहे. यामध्ये जखमी संतोष देशमुख यांना अंडरवेअरवर बसवून दुसरा व्यक्ती शूटिंग घेत आहे.

  • व्हिडिओ क्रमांक.12

वेळ - 15.59.18, 12 सेकंदांचा हा व्हिडीओ आहे. यामध्ये संतोष देशमुख यांना अंडरवेअरवर बसवून जबरदस्तीने केस ओढून बोलण्यास लावून शूटिंग काढली जात आहे.

  • व्हिडिओ क्रमांक.13

वेळ - 17.34.05 (५ वाजून ३४ मिनिटं) (मोबाईल मधील व्हिडिओचे नाव- VID20241209173219)

1 मिनिट आणि 44 सेकंदांचा हा व्हिडीओ आहे. यामध्ये संतोष देशमुख यांना या स्कॉर्पिओ काळ्या रंगाच्या गाडीजवळ अंडरवेअरवर उताणे स्थितीत झोपवल्याचे दिसत आहे. तसेच आरोपी हे संतोष देशमुख यांना रक्ताचे डाग असलेली पॅन्ट घालताना दिसत आहेत.

  • व्हिडिओ क्रमांक 14

वेळ - 17.35.16, एक मिनिट चार सेकंदांचा हा व्हिडीओ आहे. (व्हिडीओ फाईल-VID20241209173411)

या व्हिडिओमध्ये आरोपी हे संतोष देशमुख यांना उठवून बसवून शर्ट घालताना दिसत आहे. शर्ट घालण्याअगोदर फाटलेले व रक्ताने भरलेले बनियान फेकून देताना दिसत आहेत.

  • व्हिडिओ क्रमांक 15

वेळ - 17.53.52, हा व्हिडीओ 24 सेकंदांचा आहे. (मोबाईलमधील व्हिडिओ फाईलचे नाव VID20241209175326)

या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती विव्हळताना आवाज येत आहे. यासोबतच आठ फोटोदेखील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com