सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला विजेतेपद

पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ स्पर्धेतील विजेत्या संघासमवेत मान्यवर
पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ स्पर्धेतील विजेत्या संघासमवेत मान्यवर

परभणी : येथे झालेल्या पुरुष गटाच्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद रविवारी (ता. पाच) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पटकावले. जयपूरच्या राजस्थान विद्यापीठाने उपविजेतेपद, तर कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने व जोधपूरच्या जयनारायण व्यास विद्यापीठाने अनुक्रमे तृतीय व चतुर्थ स्थान पटकावले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व कमलताई जामकर महिला महाविद्यालयाच्या वतीने ता. दोन ते पाच जानेवारी दरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  स्पर्धेचे पारितोषिक वितरण रविवारी (ता.पाच) आमदार डॉ. राहुल पाटील  यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष हेमंतराव जामकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर भगवान वाघमारे, स्थायी समितीचे सभापती सुनील देशमुख, संस्थेचे सचिव विजय जामकर, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा. यू. डी. इंगळे, प्राचार्य डॉ. वसंत भोसले, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव, नगरसेवक सचिन अंबिलवादे, प्रा. डॉ. के. के. पाटील पाटील, महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. अभिजित सरनाईक, जिल्हा परिषद सदस्य दिनेश बोबडे, प्रा. डॉ. राजेश्वर देशमुख, प्रा. मदन ठाकूर, प्रा. माधव कदम, प्रा. हेमंत शिंदे,  प्रा. संतोष कोकीळ, स्पर्धा नियंत्रक विनायक कोकमठानकर, किशोरसिंह आदींची उपस्थिती होती.

पुणे विद्यापीठाचा एकतर्फी विजय
स्पर्धेच्या साखळी फेरीच्या सामन्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आपल्या तीनही लढतीत प्रतिस्पर्ध्यांवर एकतर्फी मात करीत विजेतेपद पटकावले. गतवर्षी उपविजेतेपदावर राहिलेल्या पुणे विद्यापीठाने या वेळी मात्र प्रतिस्पर्धी संघाला कुठलीच संधी मिळू दिली नाही. पुणे विद्यापीठाचा धडाका एवढा जबरदस्त होता, की या संघाने शिवाजी विद्यापीठाचा तीन विरुद्ध दोन,  राजस्थान विद्यापीठाचा चार विरुद्ध एक,  तर जयनारायण व्यास विद्यापीठाचा पाच विरुद्ध शून्य गुणांनी पराभव करीत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.  


उपविजेता ठरले  राजस्थान विद्यापीठ

स्पर्धेचे उपविजेतेपद प्राप्त राजस्थान विद्यापीठाने शिवाजी विद्यापीठावर चार विरुद्ध एक,  तर जयनारायण व्यास विद्यापीठावर चार विरुद्ध एक अशा गुणांनी मात केली . तिसऱ्या स्थानी आलेल्या शिवाजी विद्यापीठाला केवळ एक विजय संपादन करता आला. या विद्यापीठाने जयनारायण व्यास विद्यापीठाचा चार विरुद्ध एक गुणाने पराभव केला. तर चौथ्या स्थानी राहिलेल्या जयनारायण व्यास विद्यापीठाला एकही साखळी फेरीचा सामना जिंकता आला नाही. परिणामी, चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com