समाजभान ठेवल्याने भरली वंचितांची शाळा 

अंबड : समाजभान टीमच्या वतीने सुरू करण्यात आलेली शाळा.  
अंबड : समाजभान टीमच्या वतीने सुरू करण्यात आलेली शाळा.  

अंबड (जि.जालना) - भंगार, कचरावेचक, भिक्षेकरी, शाळाबाह्य असलेल्या वंचितांची अंबड शहरात आता नववर्षापासून मुक्‍त शाळा भरत आहे. विशेष म्हणजे केवळ अक्षरओळख इतके या शाळेचे स्वरूप नाही, योग-प्राणायाम, संगीत, कराटे प्रशिक्षणही या मुलांना दिले जात आहे. यासाठी समाजभान टीमने पुढाकार घेतला आहे. 

अनेक मुले शाळेपासून दूरच 
पालकांची अनास्था, जागरूकतेचा अभाव आणि पोटाचा प्रश्न यामुळे अनेक मुले शाळेपासून दूरच होती. सकाळी झोपेतून उठल्यानंतर ही मुले शहराच्या कानाकोपऱ्यात भिकेचा कटोरा घेऊन फिरत होती. या मुलांमध्ये शिक्षणातील सातत्य आणि नियमितता यावी यासाठी समाजभान टीमकडून त्यांच्या वस्तीत, वंचितांच्या अंगणातली आनंददायी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. या शाळेसाठी विजय जाधव, संतोष जाधव, अमोल आडोसा यांनी तात्पुरती जागा उपलब्ध करून दिली. 

मुलांना सर्वांगीन शिक्षण
समाजभानचे दादासाहेब थेटे यांनी या शाळेमध्ये पूर्णवेळ मुलांना शिकविण्याची जबाबदारी उचलली. योग शिक्षणासाठी गणेश मिरकड, कराटे शिक्षणासाठी ज्ञानेश्वर मोरे तर संगीत शिकवणीसाठी श्‍याम उगले सहकार्य करणार आहेत. पहिल्या दिवशी झोळी व कटोरी न घेता वही-पेन घेऊन अनेक मुले शाळेत दाखल झाली.

पहिल्याच दिवशी चाळीस मुले 
फुगे आणि विविध फलकांनी शाळा सजविण्यात आली. अशोक धरमशी यांनी पहिल्या दिवशी या मुलांना मिठाई वाटप केली. फुले दांपत्याने भिडेवाड्यात शाळा सुरू केली होती. हा वसा जपत समाजभान टीमने हा उपक्रम सुरू केला. पहिल्याच दिवशी चाळीस मुलांनी शाळेला हजेरी लावली.

अनेकांचा मदतीचा हात
या शाळेसाठी माजी आमदार शिवाजीराव चोथे, अरुण मकासरे यांनीही मदतीचा हात दिला आहे. समाजभानचे संतोष जिगे, अशोक धरमशी, दत्तात्रय शिनगारे, योगेश कव्हळे, अशोक शिंदे, सोपान पाष्टे, भालचंद्र मोरे, राहुल विसपुते, सुभाष बनकर, संतोष वरकड, चंद्रकांत आढाव, प्रकाश जाधव आदींनी परिश्रम घेतले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com