५२ शाळातील बोगस तुकड्यावरील शिक्षकांचे होणार समायोजन

हरी तुगावकर
रविवार, 6 मे 2018

एकीकडे बोगस तुकड्यांचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना शासनाने समायोजनाच्या दृष्टीने माहिती मागवून उपासमारीची वेळ आलेल्या शिक्षकांना दिलासा दिला आहे.
एकीकडे बोगस तुकड्याच्या प्रकरणात ९९ शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष, सचिव व मुख्याध्यापक अशा एकूण ३२७ जणावर येथे गुन्हा दाखल आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने गेली काही वर्षापासून उपासमारीची वेळ आलेल्या या शिक्षकांना राज्य शासनाने एक प्रकारे दिलासा दिला आहे. या शिक्षकांच्या समायोजनाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

लातूर : गेल्या तीन चार वर्षापासून जिल्हयात गाजत असलेल्या बोगस तुकड्याप्रकरणात राज्य शासनाने `गुरुजीं`ना दिलासा देण्याचे ठरवले आहे. यातून
या बोगस तुकड्यावर काम करणाऱय़ा शिक्षकांचे समायोजन करण्याच्या प्रक्रियेला आता सुरवात झाली आहे. यातून शासनाने जिल्ह्यातील ५२ शाळेतील बोगस तुकड्यावर किती शिक्षकांचे समायोजन करणे आवश्यक आहे याची शाळानिहाय यादी मागवली आहे.

एकीकडे बोगस तुकड्यांचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना शासनाने समायोजनाच्या दृष्टीने माहिती मागवून उपासमारीची वेळ आलेल्या शिक्षकांना दिलासा दिला आहे.
एकीकडे बोगस तुकड्याच्या प्रकरणात ९९ शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष, सचिव व मुख्याध्यापक अशा एकूण ३२७ जणावर येथे गुन्हा दाखल आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने गेली काही वर्षापासून उपासमारीची वेळ आलेल्या या शिक्षकांना राज्य शासनाने एक प्रकारे दिलासा दिला आहे. या शिक्षकांच्या समायोजनाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

गेल्या काही वर्षापासून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात या बोगस तुकड्याचे प्रकरण गाजत आहे. यात जिल्ह्यातील विविध ९९ शाळांनी बेकायदेशीररीत्या २६२ तुकडया घेवून त्यावर ३६९ शिक्षकांची नियुक्ती केली होती. या प्रकरणी माजी सहायक प्रकल्प अधिकारी व्ही. एम. भोसले न्यायालयात गेले होते. यात न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या तत्कालीन पाच शिक्षणाधिकाऱय़ासह १३ कर्मचाऱयासह जिल्ह्यातील ९९ शाळांच्या अध्यक्ष, सचिव व मुख्याध्यापक असे एकूण
३२७ जणावर शासनाची सहा कोटी ५८ लाख ९७ हजार ९९० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आॅगस्ट २०१७ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. याच्या चौकशीसाठी पोलिस अधिक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी चार अधिकाऱय़ांचे एक स्वतंत्र पथकही नियुक्त केले आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे.

दरम्यानच्या काळात शासनाने ९९ पैकी ५२ शाळामध्ये नव्याने तुकड्या घेतल्या
होत्या. या ५२ पैकी ३८ शाळामध्ये मुलांची पटसंख्या जास्त होती. त्यामुळे या
संस्थाचालकांनी शासनाकडेही धाव घेतली होती. यात शासनाने या शाळांच्या
तुकड्यांना कायम विनाअनुदानित करून टाकले होते. या सर्व प्रकारात सुमारे दिडशे
शिक्षक फरफटत चालले होते. शासन समायोजन करीत नाही, संस्थाचालक पगार देत नाही यात त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. हे लक्षात आल्यानंतर राज्य शासनाने आता या शिक्षकांचे समायोजन करण्याचा विचार सुरु केला आहे. तसे आदेशही दिले आहेत. यातूनच या ५२ शाळामधील किती शिक्षकांचे समायोजन करणे आवश्यक आहे, त्यांची संख्या व शाळानिहाय शिक्षकांची नावे तसेच उपरोक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण होण्याकरीता कोणते निकष आवश्यक ठरतील याबाबची माहिती पंधरा दिवसाच्या आत शासनास व शिक्षण संचालनालयास सादर करावी, असे आदेश शिक्षण उपसंचालक व्ही. के. खांडके यांनी शिक्षणाधिकाऱयांना दिले आहेत. शासनाने समायोजनाच्या हालचाली सुरु केल्याने या शिक्षकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

Web Title: school problems in Latur