संस्काराची शाळा ही आईवडील असते : असं कोण म्हणाले ते वाचाच  

Nanded News
Nanded News

नांदेड : ‘‘संस्काराची शाळा ही आईवडील असते. कुटुंब व्यवस्था आज नामशेष होत चालली आहे. घराची संस्कृतीही दिवसेंदिवस नष्ट होऊन फ्लॅट संस्कृती समाजामध्ये रुजत आहे. त्यामुळे मुलांवरील नियंत्रणे कमी होत आहेत. त्यासाठी आईवडिलांनी आपल्या मुलांना योग्य संस्कार देऊन त्यांचे पालनपोषण करून जबाबदारी पार पाडणे आवश्‍यक आहे. 

संस्कृती जात आहे लयाला
स्पर्धा तीव्र झालेली असल्याने प्रत्येकजण धावपळीमध्ये जीवन जगत आहे. महागाई वाढत असल्याने कुटुंबातील पती आणि पत्नीही घराबाहेर पडत आहे. त्यामुळे मुलांवर लक्ष द्यायला घरात कुणीच नसते. विभक्त कुटुंबपद्धतही याला कारणीभूत आहे. परिणामी मुलांवर पूर्वीसारख्या संस्काराच्या गोष्टी सांगायला घरात कुणीच नसल्याने, मुलांवर संस्कारच होताना दिसत नाही. 

पाण्याचे नियोजन आवश्‍यकच
प्रा.डॉ. व्ही.एन. पुरणशेट्टीवार यांनी पाणी मार्गदर्शन या विषयावर बोलताना म्हणाल्या की, पाणी हे मानवनिर्मित घटक नाही. आपण पाणी तयार करू शकत नाही. सर्व सोंग करता येते, पण पाणी आणता येत नाही. पैसा जसा आपण जपून वापरतो, तसेच आपण पाणी जपून ठेवावे. पाण्याची बचत ही थेंबाथेंबातून होते. आपण पाण्याचे नियोजन करावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

जीवनात सुख दुःख येतेच, पण...
प्रा.डॉ. एन.जी. पाटील यांनी व्यसनमुक्तीकडून आरोग्याकडे या विषयावर बोलताना म्हणाले की, संतांनी सांगितले की, दुसऱ्यांचा चांगला विचार करावा. विनाकारण चिंता वाढवणे हे मानसिक आजाराचे लक्षण आहे. मानवी जीवनात सुख-दु:ख येतच असते. त्यात आपण समतोल राखून जीवन जगावे. समाजात राहताना समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय याचे पालन करावे. 

मुलींनी स्वसंरक्षणाचे धडे गिरवावेत
श्रीमती विद्या आळणे यांनी मुलींवरील होणाऱ्या अत्याचारावर मार्गदशन केले. सद्यस्थितीतल्या घटना बघता मुलींना शालेयस्तरावरच स्वसंरक्षणाचे धडे देण्याची गरज आहे. मुलींनीही न घाबरता ग्रुपने वावरल्यास अशा घटना घडूच शकणार नसल्याचे श्रीमती आळणे यांनी सांगितले. याप्रसंगी उपसरपंच दौलतराव पोपळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. दिलीप काठोडे, शिबीर सहाय्यक प्रा. सुनील बोईनवाड, विश्वांभर रामटेके यांच्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com