जालन्यात भंगाराच्या गोदामाला आग

घटनास्थळी अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले.
fire
firesakal

जालना : शहरातील दुःखीनगर परिसरात असलेल्या भंगाराच्या गोदामला मंगळवारी (ता.२९) मध्यरात्री एकच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. यात लाखो रुपयांचे साहित्य जाळून खाक झाले आहे. शहरातील दुःखीनगर भगत असलेल्या भंगाराच्या गोदामाला मंगळवारी(ता.२९) मध्यरात्री आग लागल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. त्यानंतर नागरिकांनी परिसरात बोर सुरू करून आग विझविण्याचा प्रयन्त केला. मात्र, गोदामात असलेल्या प्लाँस्टिक, ताडपत्री,इतर साहित्यामुळे आगा अधिक भडकली.

त्यानंतर नागरिकांनी अग्निशमन विभागाला आगीची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सुमारे एक तासा अथक परिश्रमानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. मात्र, तो पर्यंत गोदामात असलेले भंगार साहित्य जळून खाक झाल्याने भंगार व्यापाऱ्याचं लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीचे कारण स्पष्ट झाले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com