धक्कादायक..! खुद्द एसडीओच तलाठ्यांना सांगतात, पैसे खायचे कसे...

sdo beed.jpg
sdo beed.jpg
Updated on

बीड : महसूलमधील भ्रष्टाचार कोणाला नवा नाही. मात्र, तलाठ्यांनी भ्रष्टाचार केला तहसिलदार किंवा उपविभागीय अधिकाऱ्यांकडून न्याय मिळेल, असा साधारण समज आहे. मात्र, खुद्द उपविभागीय अधिकारीच तलाठ्यांना ’कोणत्या प्रकरणात किती पैसे खायचे’ याची शिकवण देत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

सचीन केंद्रे या निलंबीत तलाठ्यानेच हा अंबाजोगाईच्या उपविभागीय अधिकारी शोभादेवी जाधव यांच्याबाबत बोभाटा केला आहे. अगदी बैठकीत तलाठ्यांना पैसे खाण्याची शिकवण देत असल्याची अर्धा तासाच्या ऑडिओ क्लिपसह अधिकाऱ्यांच्या डिशचे रिचार्ज केल्याच्या पावत्याही गुरुवारी (ता. ३०) विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीला जोडल्या आहेत.

ता. १८ फेब्रुवारीला अंबाजोगाईत तलाठ्यांच्या बैठकीत शोभादेवी जाधव यांनी आर्थिक देवाण-घेवाणीबद्दल थेट वक्तव्य केल्याचा दावा करत याचीही ऑडिओ क्लिपदेखील सादर केली आहे. ऑडीओतील आवाज त्यांचाच आहे का, याची ‘सकाळ’ पुष्टी करत नाही. मात्र, या तारखेला त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीचा उपस्थिती अहवालही या तक्रारीसोबत जोडला आहे. सीडीतील संभाषणात शोभादेवी जाधव कोणत्या मिनीटाला काय बोलल्या याचा गोषवाराही तक्रारीत असून त्यात अगदीच गंभीर आहेत.

महिन्याला २५ हजार अन॒ बरेच काही
अंबाजोगाई सज्जाच्या अतिरिक्त पदभारासाठी ५० हजार रुपये, तसेच महिन्याला २५ हजार रुपये व मे महिन्यात या सज्जावर बदलीसाठी एक लाख रुपये वमागीतल्याचे सचिन केंद्रे यांनी तक्रारीत म्हटले आहे. गंभीर म्हणजे महिन्याला २५ हजारांसह त्यांच्या वाहनात इंधन टाकणे, शासकीय व खासगी वाहनांच्या दुरुस्तीचा खर्च करायला लावणे, स्वत:च्या घरात आरओ फिल्टर बसवून घेणे आणि घरातील कार्यक्रमांचा खर्च करायला लावणे, पुर्वी २५ हजार महिन्यांवरुन ५० हजारांची मागणी, असे आरोपही शोभादेवी जाधव यांच्यावर तक्रारीत करण्यात आले. विशेष म्हणजे सचिन केंद्रे यांच्या फोनपेवरुन जाधव यांच्या डिश टिव्हीचे रिचार्ज केल्याच्या पावत्याही सोबत जोडल्या आहेत.

२० लाख द्यायला तयार; कोणत्या प्रकरणात किती पैसे खायचे
सचिन केंद्रे यांनी जाधव यांच्या बैठकीतील ऑडिओ क्लिपही तक्रारीसोबत सादर केली आहे. तक्रारीत ऑडिओ क्लिपमधील ‘मिनीट टु मिनीट’ संभाषण नमुद केले असून ते शोभादेवी जाधव यांचे असल्याचे म्हटले आहे. नाना लाडच जे झालं ते तुमच्याबरोबर करायची माझी चुकून इच्छा नाही. आम्ही लाडची प्रतिनियुक्ती, निलंबन आणि सगळंच केलं. लाड २० लाख रुपये द्यायला तयार होता. त्रास दिल्यावरच तुम्ही फक्त एसडीओची किंमत करणार आणि एसडीओला विचारणार का. कोणत्या प्रकरणाला किती पैसे खायचे याची पद्धत समजून घ्या, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. 

इथल्या पॉलिटीशेन्स सोबत मला रिलेशन खराब करुन घ्यायचे नाहीत. पण, जर मला त्रास दिला, तुमच्यामुळे माझे रिलेशन खराब झाले तर मी तुमचं काहीतरी करुन टाकीन. खोटेला सांगून किंवा कोणाला तरी सांगून किती आणून देता. २० किंवा २५ हजार रुपये. पण, तुम्ही कधी प्रत्यक्ष भेटता का. मी आजुन ठरवलं नाही. पण, ठरवलं तर तुम्हाला त्रास होईल. सदर वक्तव्य शोभादेवी जाधव यांची असल्याचे केंद्रे यांनी निवेदनात म्हटले असून आतापर्यंत तीन लाख रुपयांची पिळवणूक केल्याचेही म्हटले आहे. यातील लाड हे निलंबीत तलाठी तर लिपीक व कोदरकर तलाठी आहे. 

तक्रारीबाबत शोभादेवी जाधव यांना विचारले असता, काय अर्ज दिला ते आपणाला माहित नसून विचारणा झाल्यानंतर आपण उत्तर देऊ. ऑडिओ क्लिपबाबत माहिती नसल्याचेही श्रीमती जाधव यांनी ‘सकाळ’ ला सांगीतले.

(संपादन-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com