Earthquake News : भूकंपमापन केंद्राची इमारत शोभेपुरती! ; अधिकारी, कर्मचारी फिरकत नाहीत, ३० सप्टेंबरला येते आठवण

किल्लारी येथील ३० सप्टेंबर १९९३ च्या महाप्रलयंकारी भूकंपानंतर पुनर्वसित गावामध्ये भूकंप झाल्याची नोंद राहावी, त्याद्वारे प्रशासन व ग्रामस्थ सतर्क होतील, या उदात्त हेतूने येथे भव्य अशी इमारत उभारण्यात आली.
Earthquake News
Earthquake Newssakal

किल्लारी : किल्लारी येथील ३० सप्टेंबर १९९३ च्या महाप्रलयंकारी भूकंपानंतर पुनर्वसित गावामध्ये भूकंप झाल्याची नोंद राहावी, त्याद्वारे प्रशासन व ग्रामस्थ सतर्क होतील, या उदात्त हेतूने येथे भव्य अशी इमारत उभारण्यात आली. तीत भूकंपमापक यंत्र बसविण्यात आले, मात्र तेथे कुठलाही अधिकारी, कर्मचारी फिरकत नसल्याने ही वास्तू शोभेची बनली आहे. केवळ ३० सप्टेंबरला अधिकाऱ्यांना या इमारतीची आठवण होते, अशी स्थिती आहे.

भूगर्भातील लहरींचे मोजमाप करून येथील नोंद हैदराबाद येथील ‘एनजीआरआय’ केंद्राकडे पाठवली जाते. तेथून ती नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात, तेथून सर्वत्र माहिती दिली जाते. ही माहिती प्रथम स्थानिक नागरिकांना आणि प्रशासनाला होणे गरजेचे आहे.औराद शहाजानी, बसवकल्याणपासून सोलापूरपर्यंत उभारण्यात आलेल्या आठ भूकंप केंद्रांची नोंद नांदेड येथील केंद्रात होते. केवळ किल्लारी येथील भूकंपमापक केंद्राची नोंद हैदराबाद येथील कार्यालयात होते.

Earthquake News
Earthquake Marathwada : भूकंपाच्या धक्क्यांनी मराठवाडा हादरला

यापूर्वी भूगर्भात झालेल्या गूढ आवाजाच्या अनुषंगाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भूशास्त्र संचालकांच्या टीमने येथील केंद्राला भेट देऊन यंत्रणेची पाहणी केली होती. त्यावेळीही येथील नागरिकांनी किती रिश्टर स्केलचा भूकंप झाला, याची माहिती आपल्याला स्थानिक पातळीवर मिळावी, अशी मागणी केली होती.

किल्लारी हे भूकंपाचे केंद्र आहे. येथे भूकंपमापन केंद्राची इमारत आहे. परिसरात भूकंप झाल्यास या केंद्रातून सर्वत्र माहिती पोचली पाहिजे. त्यासाठी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दररोज या केंद्रात उपस्थित रहायला हवे, असे वाटते.

- अनंत बाबळसुरे, भूकंपग्रस्त ग्रामस्थ, किल्लारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com