Earthquake News : पैठणचे भूकंपमापन केंद्र बंद ; नाथसागराच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक यंत्रणा हवी

मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत गुरुवारी (ता. २१) रोजी भूकंपाचे हादरे बसले. कोठेही भूकंप झाल्यास त्याची नोंद घेणारे व विशेष बाब म्हणून जायकवाडी धरणाच्या (नाथसागर) सुरक्षिततेसाठी बसविण्यात आलेल्या भूकंपमापन केंद्रातील भूकंपमापक बंद आहे.
Earthquake News
Earthquake News sakal

पैठण : मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत गुरुवारी (ता. २१) रोजी भूकंपाचे हादरे बसले. कोठेही भूकंप झाल्यास त्याची नोंद घेणारे व विशेष बाब म्हणून जायकवाडी धरणाच्या (नाथसागर) सुरक्षिततेसाठी बसविण्यात आलेल्या भूकंपमापन केंद्रातील भूकंपमापक बंद आहे. धक्कादायक बाब म्हणचे चार वर्षांपासून या केंद्रातील भूकंपमापन यंत्रच कालबाह्य झाल्याने त्यात कोणत्याही नोंदी होत नाहीत. त्यामुळे आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण असलेल्या नाथसागराच्या सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी अत्याधुनिक भूकंपमापन यंत्र बसविण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

नाथसागर धरणावर १९९४ मध्ये भूकंपमापन यंत्र बसविण्यात आले. यामध्ये हाताने या यंत्रातील कागद बदलणे, यंत्राद्वारे निघालेल्या आलेखावरून किती रिश्टर स्केलचा भूकंप झाला, याचा निष्कर्ष काढला जातो. आज या यंत्रास ३० वर्षे झाली. अनेक नवनवीन तंत्रज्ञान आले, मात्र येथे अनेक वर्षे ‌हे जुनेच यंत्र वापरण्यात येत होते. त्यात हे यंत्र अनेकवेळा बंदही पडले होते. भूकंप झाल्यावर हे यंत्र बंद पडल्यास इतर कार्यालयांकडून माहिती घेऊन भूकंपाचे गणित मांडले जात होते. हे यंत्र जुनाट झाले. त्याचबरोबर काही वर्षांपासून याठिकाणी प्रशिक्षित कर्मचारी नव्हते. दरम्यान, आता नवीन भूकंपमापन यंत्र या केंद्रात बसविण्यात येणार असल्याची माहिती धरणाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी दिली.

अमेरिकेन‌ यंत्राची किंमत ७ लाख

ता. २० डिसेंबर २०१७ रोजी हे यंत्र बंद पडले असून, आता या घटनेला सात वर्षे झाली आहेत. अमेरिकेत निर्मित ‘एमईक्यू-८८० अर्थक्वेक’ या कंपनीचे हे यंत्र होते. ता. १५ नोव्हेंबर १९९४ मध्ये बसविण्यात आलेल्या भूकंपमापन यंत्राची किंमत त्यावेळी साडेसात लाख रुपये होती. धरणामागील जलक्षेत्राच्या भागात भूकंपमापन केंद्र आहे. यंत्रात बिघाड झाल्यामुळे कार्यकारी अभियंता व दगडी धरण सहायक अभियंत्यांनी भूकंपमापन केंद्रातील या यंत्राला दुरुस्तीसाठी नाशिक येथील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेत पाठविल्याचे सूत्रांनी सांगितले.

Earthquake News
Earthquake Marathwada : भूकंपाच्या धक्क्यांनी मराठवाडा हादरला

पैठण शहरात गुरुवारी (ता. २१) रोजी सकाळी ७ पुन्हा एकदा जमिनीत गूढ आवाज (स्फोटासारखा) ऐकू आल्याने नागरिक भयभीत झाले. आठ महिन्यांनंतर हा आवाज झाल्यामुळे आवाज कशाचा? असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला. सकाळी सातच्या सुमारास हा गूढ आवाज झाला. या नोंदीसाठी भूकंपमापन केंद्र सुरू करावे.

- पवन लोहिया, (शहराध्यक्ष, व्यापारी महासंघ, पैठण).

जलसंपदा विभागाने नाशिक येथील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या तज्ज्ञांकडे (मेरी संस्था) यंत्र पाठविले आहे. यासाठी जलसंपदा विभागाकडून ४५ लाख रुपये देण्यात आले आहे. महाराष्ट्रातील २८ धरणांवर एकाच दिवशी हे भूकंपमापन यंत्र बसविण्यात येणार आहे. लवकरच हे अत्याधुनिक यंत्र कार्यान्वित करण्यात येईल.

- प्रशांत जाधव, कार्यकारी अभियंता, नाथसागर धरण पैठण.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com