सेलू तालूक्यात वर्षभरापासून ३१ गावांत पोलिस पाटलांची पदे रिक्त

तालुक्यातील ३१ गावात वर्षभरापासून पोलिस पाटील यांचे पद रिक्त आहेत. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर ही रिक्त पदे भरावीत अशी मागणी जोर धरु लागली आहे.
पोलिस पाटील पद रिक्त
पोलिस पाटील पद रिक्त

सेलू ( जिल्हा परभणी ) : तालुक्यातील ३१ गावात वर्षभरापासून पोलिस पाटील यांचे पद रिक्त आहेत. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर ही रिक्त पदे भरावीत अशी मागणी जोर धरु लागली आहे.

तालुक्यातील ९५ गावे ही चार पोलिस स्टेशनला जोडली गेली आहेत. यामध्ये सेलू पोलिस स्टेशनमध्ये ५९ गाव तर चारठाणा पोलिस स्टेशनमध्ये २४ गावे, बोरी पोलिस स्टेशनला १० गावे तर पाथरी पोलिस स्टेशनमध्ये दोन गावांचा समावेश करण्यात आला आहे. गावकीच्या भांडण तंट्यात पोलिस पाटलाची भूमिका ही समन्वयाची असल्याने यांच्या मध्यस्थीने बहुतांश प्रकरणे गावपातळीवर मिटविण्यासाठी यश मिळत असते.

हेही वाचा - महावितरणच्या अभियंत्यास धक्काबुक्की; वाईबाजार उपकेंद्रातील घटना

परंतु सेलू पोलिस स्टेशन अंतर्गत अठरा गावे तर चारठाणा पोलिस स्टेशन अंतर्गत अकरा पाथरी व बोरी पोलिस स्टेशन अंतर्गत प्रत्येकी एक अश्या एकूण ३१ गावात पोलिस पाटलांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे त्या गावातील कायदा व सुव्यवस्था वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक कागदपत्रे पुरविणे, गावच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्याची माहिती पोलिसांना कळविणे, पोलिसांना गुन्ह्याच्या चौकशीत मदत करणे, नैसर्गिक आपत्तीची माहिती तहसीलदारांना कळविणे तसेच संसर्गजन्य रोगांची साथ असल्यास त्याची माहिती देणे गावच्या हद्दीत कोणी विनापरवाना शस्त्र बाळगल्यास त्याची माहिती संबधित पोलिस स्टेशन देणे ही कामे या गावात विस्कळीत झाली आहेत. तालुक्यातील रिक्त असलेल्या पोलिस पाटील भरती प्रक्रियेकरीता वरिष्ठ कार्यालयाकडून मंजुरी घेणे गरजेचे आहे. मात्र या प्रक्रियेकडे तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने ३१ गावांत पोलिस पाटलांची पदे वर्षभरापासून रिक्त आहेत.

येथे क्लिक करा - तोतया पोलिसांनी देगलूरात व्यापाऱ्याला गंडविले; घटना सीसीटीव्हीत कैद

सेलू पोलिस स्टेशन अंर्तगत पिंप्रोळा, ढेंगळी पिंपळगाव, खादगाव, खुपसा, कुंडी, ब्राम्हणगाव (प्र.को.), डुघरा, राजा, राजवाडी, डिग्रस (खु.), साळेगाव, खेर्डा (दु.की.), ब्रम्हवाकडी, रायपूर, तिडी पिंपळगाव, सिध्दनाथ बोरगाव, गोहेगाव, डिग्रस जहाँगीर, बोरी पोलिस स्टेशन अंतर्गत कुपटा, चारठाणा पोलिस स्टेशन अंतर्गत वाई, गोंडगे पिंपरी, सिंगठाळा, देवगाव (फाटा.), बोरकीणी, निरवाडी (बू.), निरवाडी (बु., खु.), सावंगी (पी. सी.), गिरगाव (खु.), गिरगाव (बु.), केमापूर तर पाथरी पोलिस स्टेशन अंतर्गत लाडनांद्रा गावाचा समावेश आहे.

कोरोना कालावधीत शासनाकडून सर्व भरत्या रद्द आहेत.तरिही पोलिस पाटील रिक्त पदाचा अहवाल शासनाकडे सादर केला आहे. शासनस्तरावरुन सूचना आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.

- उमाकांत पारधी, उपविभागीय अधिकारी, सेलू

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com