तोतया पोलिसांनी देगलूरात व्यापाऱ्याला गंडविले; घटना सीसी टीव्ही कैद

पोलिसांकडून चेकिंग सुरु असून आम्ही पोलिस आहोत अशी बतावणी करुन तुमच्या हातातील दोन अंगठ्या व गळ्यातील सोन्याची चैन तुमच्या जवळील रुमालात बांधुन खिशात ठेवण्यास सांगितले.
देगलुर क्राईम
देगलुर क्राईम

देगलूर ( जिल्हा नांदेड ) : आम्ही पोलिस आहोत ,पुढे चेकिंग सुरु आहे, तुमची तपासणी करायची आहे म्हणून येथील विटाचा व्यवसाय करणारे प्रमोद खुशालराव पाटील ठाणेकर यांना दोन तोतया पोलिसांनी त्यांच्या हातातील दोन अंगठ्या व गळ्यातील चैन असा जवळपास सव्वा दोन लाखाचा मुद्देमाल घेऊन पसार झाले. ही घटना ता. १६ रोजी दुपारी तहसील कार्यालयाच्या आवारात घडली असून ती सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून स्थानिक पोलिसांसह गुन्हे शोध पथकापुढे चोरट्यांनी मोठे आव्हान उभे केले आहे.

बुधवार (ता. १६) रोजी दुपारी दोन वाजता काही कामानिमित्त प्रमोद खुशालराव पाटील ठाणेकर हे देगलूर तहसील कार्यालयात गेले होते. त्यावेळेस त्यांच्याजवळ मोटरसायकलवर दोन युवक येऊन थांबले. त्यांनी स्वतः ची ओळख सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. पुढे पोलिसांकडून चेकिंग सुरु असून आम्ही पोलिस आहोत अशी बतावणी करुन तुमच्या हातातील दोन अंगठ्या व गळ्यातील सोन्याची चैन तुमच्या जवळील रुमालात बांधुन खिशात ठेवण्यास सांगितले. नंतर तो रुमाल त्यांनी स्वतः जवळ घेतला. त्यातील ऐवज हात सफाईने काढून घेऊन परत तो रुमाल श्री ठाणेकर यांना परत करत तेथून ते पसार झाले.

हेही वाचा - किनवट तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे चालु असलेल्या महामार्गाच्या पुलांच्या कामादरम्यान निर्माण केलेल्या बाजुचे प्रासंगिक पुल वाहुन गेल्याने वाहतुक खोळंबली

मोटरसायकल पुढे गेल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली मात्र तोपर्यंत चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. ही सर्व घटना तहसील कार्यालयाच्या आवारातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्यानंतर श्री. ठाणेकर यांनी तात्काळ पोलिस ठाणे गाठून स्वतःवरील आपबिती पोलिसांसमोर कथन केली. पोलिसांनीतात्काळ तपासाची चक्रे फिरवत दोन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. गेल्या काही दिवसापासून देगलूर शहर व परिसरात बतावणी करून लूट करण्याच्या प्रकारात वरचेवर वाढ होत असून यामध्ये वृद्ध महिला, लहान बालके यांना टारगेट केल्या जात आहे. याकामी स्थानिक गुन्हे शोध पथकाने अधिक सक्रिय होऊन शहर परिसरातील अशा घटनावर निर्बंध आणण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com