Coronavirus Latest : उस्मानाबादमध्ये नवे सात रुग्ण

Seven New COVID-19 infections reported in Osmanabad
Seven New COVID-19 infections reported in Osmanabad

उस्मानाबाद : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २१) सात जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. दुपारी एक उमरगा येथील महिलेसह नवीन सहा रुग्णाचे अहवाल रात्री उशिरा प्राप्त झाले आहेत. यामध्ये वाशी तालुक्यातील पिंपळगाव येथील सहा वर्षांची मुलगी, परंडा तालुक्यातील खांडेश्वर वाडीतील रुग्णाच्या संपर्कातील २७ वर्षीय तरुण, लोहारा तालुक्यातील जेवळी येथील रुग्णाच्या संपर्कातील चार जण आणि एका १९ वर्षीय युवतीचाही समावेश आहे. त्यामुळे रुग्ण संख्या २३ वर गेली आहे. चार जण बरे होऊन घरी गेले आहेत. 

उमरगा येथील एका महिलेला गुरुवारी दुपारी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. गुरुवारी दुपारी आलेल्या अहवालामध्ये ही महिला पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या १७ वर गेली आहे. ही महिला मुंबईवरून उमरगा शहरातील एसटी कॉलनी येथे परतली होती. त्यानंतर त्रास सुरू झाल्याने तिला उपजिल्हा रुग्णालयामध्ये
दाखल करण्यात आले होते. विशेष म्हणजे महिलेचे अगोदरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर तिसरी चाचणी पॉझिटिव्ह आल्याने चिंता व्यक्त होत आहे. त्यात रात्री उशिरा सहा रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाचा चांगलाच शिरकाव व्हायला सुरवात झाली आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांत आता कोरोनाने खातं उघडल्याचे दिसून येत आहे. 

 नऊ टक्के भागात कोरोना व्यापला तरीही... 
 
जिल्ह्यात भीतीचे वातावरण
गेल्या काही दिवसांपासूनच जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केला असून, सध्या जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी एका दिवसात सात पॉझिटिव्ह निघाल्याने रुग्णसंख्या वाढली आहे. सर्व कोविडचे पॉझिटिव्ह रुग्ण हायरिस्क भागातून आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संपर्कातील रुग्णदेखील वाढत असल्याने जिल्ह्यावरील धोका वाढत असल्याचे चित्र
आहे. पंधरा ते वीस दिवसांमध्ये फक्त ग्रामीण भागात जवळपास २० हजार लोकांची, बाहेरून जिल्ह्यात आल्याची नोंद आहे.

त्यांना क्वारंटाइन केले असले तरी धोका केव्हाही उद्भवण्याची शक्यता आहे. सध्यातरी जिल्ह्यातील उस्मानाबाद व तुळजापूर नगरपालिका क्षेत्रात अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यात आले आहेत.जिल्ह्यातील कोरोनाबाधित सहा जणाच्या संपर्कात आलेल्या ७४ लोकांचे स्वॅब चाचणी घेण्यात आली होती. गुरुवारी रात्री सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आता या रुग्णांच्या संपर्कातील लोकांना शोधण्याचे काम प्रशासन करणार आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com