esakal | उदगीराला दिलासा : १७ जण निगेटिव्ह, दोघांची पुन्हा तपासणी

बोलून बातमी शोधा

CoronaVirus

शहरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील १९ जणांचे स्वॅब तपासणीसाठी लातूरला पाठवण्यात आले होते. शनिवारी (ता.९) रात्री त्याचा अहवाल आला असून त्यातील १७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे तर दोघांचा अहवाल संदिग्ध आल्याने ४८ तासानंतर पुन्हा त्यांचे स्वॅब पाठवण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.  सतीश हरिदास यानी दिली आहे

उदगीराला दिलासा : १७ जण निगेटिव्ह, दोघांची पुन्हा तपासणी

sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर (जि.लातूर) : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील १९ जणांचे स्वॅब तपासणीसाठी लातूरला पाठवण्यात आले होते. शनिवारी (ता.९) रात्री त्याचा अहवाल आला असून त्यातील १७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे तर दोघांचा अहवाल संदिग्ध आल्याने ४८ तासानंतर पुन्हा त्यांचे स्वॅब पाठवण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.  सतीश हरिदास यानी दिली आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

दरम्यान शहरातील कोरोना रुग्णालयात विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या २२ रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचे तपासणी करून त्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. शिवाय काही लक्षणे दिसल्यास त्यांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी लातूरला पाठवण्यात येत आहेत. शुक्रवारी (ता. ८) पाठवण्यात आलेल्या १९ स्वॅबचा अहवाल शनिवारी आला असून त्यात सतरा जणाचे निगेटिव्ह आले होते. दोघांचे अहवाल प्रलंबित ठेवण्यात आले होते. प्रलंबित दोन अहवालाबाबत ४८ तासानंतर त्यांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे डॉ. हरिदास यांनी सांगितले.

मयत कोरोनाबाधित महिलेच्या जवळच्या नातेवाइकांना रूग्णालयात  आणुन त्यांचे स्वॅब घेऊन तपासणीला पाठवण्यात आले होते. ज्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यांना तोंडारपाटी (ता. उदगीर) येथील अनुसूचित जाती मुलांच्या शासकीय वसतिगृहात क्वारंटाईन करण्यात आले होते.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

त्यापैकी वीस जणांची मुदत संपल्याने म्हणजे चौदा दिवस पूर्ण झाल्याने त्यांना शनिवारी घरी सोडण्यात आले. त्यांच्या हातावर शिक्के मारून त्यांना होम क्वारंटाईन राहण्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी तोंडार पाटी येथील वस्तीगृहात तहसीलदार व्यंकटेश मुंडे, रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. शशिकांत देशपांडे, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय पवार, डॉ. डांगे, डॉ. विशाल पाटील, मंडळ अधिकारी शंकर जाधव, अनिल चव्हाण आदींनी या क्वारंटाईन रूग्णांना निरोप दिला.

अन सर्वजण गहिवरले
मयत महिलेच्या संपर्कात आलेल्या परंतू त्यांचे अहवाल निगेटिव्ह आलेल्या नातेवाईकांना टप्प्याटप्प्याने क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी वीस जणांचे क्वारंटाईनचे १४ दिवस संपले. तर काहींची रविवारी आणि सोमवारी संपणार आहे. मात्र हे सर्वजण जवळच्या नात्यातील कुटुंबातील असल्याने आम्हालाही राहू द्या. आम्ही सोमवारीच एकत्रितच घरी जाऊ, असे म्हणताच सर्वांना गहिवरून आले. कुटुंबाप्रमाणे सांभाळणाऱ्या महसूल, आरोग्य विभाग, पोलिस विभागाचे सर्वांनी धन्यवाद मानले.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा