गोदापात्र तुडुंब ; शहागड - पैठण मार्ग बंद !

चक्रधर नाटकर
Saturday, 26 September 2020

  • चांदसूरा नाल्याला आला पूर. 
  • गोदापात्रातील शहागड बंधारा पाण्याखाली.  

शहागड (जि.जालना) : शहागडसह परिसरात शुक्रवारी (ता.२५) जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे चांदसुरा नाल्याला पूर आला असून शेतात पाणी शिरले आहे. तर शहागड ते पैठण मार्ग चांदसुरा नाल्याचे पाणी आल्याने हा मार्ग  बंद झाला आहे. दरम्यान गोदावरी पात्रातील पाण्याच्या प्रवाहात वाढ झाली असून शहागड येथील उच्च पातळीचा बंधारा पाण्याखाली गेला आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

शहागडसह परिसरातील पाथरवाला बु, कुरण, वाळकेश्र्वर, गोरी, गांधारी, डोमलगाव साष्टपिंपळगावसह परिसरात शुक्रवारी (ता.२६)  विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या जोरदार पावसामुळे शेतीतील कापुस, बाजरी, सोयाबीनसह इतर खरिप पिके धोक्यात आली आहेत. तर अनेकांच्या शेतात पाणी साचले. पीक पाण्याखाली गेली असून अनेक ठिकाणी ऊस आडवी झाले आहेत. अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तर शहागड परिसरातून वाहणारा चांदसुरा नाल्याला ही पूर आला आहे. या नाल्याचे पाणी  शेजारील शेतात शिरले असून खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. तर शहागड ते पैठण मार्गवर पाणी आल्याने हा मार्ग बंद झाला आहे. दरम्यान गोदावरी नदी पात्रातील पाण्याच्या प्रवाहात ही वाढ झाली आहे. त्यामुळे गोवापत्रावरील शहागड येथील उच्च पातळीचा बंधार पाण्याखाली गेला आहे. गोदावरीला आलेला पूर पाहण्यासाठी बघ्याची गर्दी होत आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन -प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shahagad paithan road close Jalna Heavy rainfall news