esakal | शरद पवार यांना ‘भारतरत्न’, मुंडेंना ’पद्मभूषण’.... 
sakal

बोलून बातमी शोधा

Latur News

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मंत्री गणपतराव देशमुख यांना ‘भारतरत्न’, तर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार जाहीर करावा, या मागणीचा ठराव मांडला जाणार आहे. 

शरद पवार यांना ‘भारतरत्न’, मुंडेंना ’पद्मभूषण’.... 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लातूर : चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे ता. २८, २९ मार्चला होणार आहे. या संमेलनात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मंत्री गणपतराव देशमुख यांना ‘भारतरत्न’, तर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार जाहीर करावा, या मागणीचा ठराव मांडला जाणार आहे. 

संमेलनाचे संस्थापक डॉ. अभिमन्यू टकले, उपाध्यक्ष संभाजी सूळ (लातूर) यांनी आज येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. डॉ. टकले म्हणाले, की पहिले संमेलन सोलापुरात, दुसरे लातुरात, तर तिसरे संमेलन म्हसवड (जि. सातारा) येथे झाले होते. चौथ्या संमेलनासाठी सांगोला तालुक्याची निवड झाली आहे. 

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान प्राचार्य आर. एस. चोपडे यांना देण्यात आला आहे. प्रा. संजय शिंगाडे स्वागताध्यक्ष असतील. सांस्कृतिक दिंडीने संमेलनाची सुरवात होईल. संमेलनाच्या उद्‍घाटन सोहळ्याला शरद पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

संमेलनात विविध क्षेत्रांतील सात मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. धनगर समाजाचे अनुसूचित जमातीचे आरक्षण, धनगर जमातीच्या सामाजिक-राजकीय पीछेहाटीची कारणे, मेंढपाळांचे प्रश्न, धनगर जमातीच्या विकासासंबंधी सर्व पक्षांची सरकारे उदासीन का? आदी विषयांवर परिसंवाद होणार आहेत.

असे होते शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर...