साहेब, आमचं सगळच शेत वाहून गेल, तुळजापूरातील शेतकऱ्यांनी मांडली पवारांकडे व्यथा ! 

sharad pawar pahni.jpg
sharad pawar pahni.jpg

तुळजापूर (उस्मानाबाद) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजपासून मराठवाडा दौर्यावर आहेत. रविवारी (ता.18) सकाळी साडे नऊ वाजता तुऴजापूरात दाखल झाले. तूळजापूर शहरापासून आठ ते दहा किमी अंतरावर असलेल्या कांक्रबा परिसरातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. यावेळी  उपस्थित शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत व्यथा मांडल्या.

साहेब आमचे खूप नुकसान झाले आहे. आमचे सगळच शेत वाहून गेलं आहे. असे सांगतांना शेतकरी व्यंकट झाडे यांचा कंठ दाटून आला. यावेळी शरद पवार यांनी उपस्थित सर्व शेतकर्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. त्यानंतर शेतकरी महादेव वाघमारे यांच्या शेतातील नुकसानीची पाहणी केली. तर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर यांच्याशी देखील चर्चा केली. 

यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार ओमराजे निंबाळकर, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, राज्य परीवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, आमदार विक्रम काळे, माजी आमदार राहुल मोटे, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, राष्ट्रवादी युवकचे महेबुब शेख, प्रताप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, तालुकाध्यक्ष धैय॔शील पाटील नांदुरीकर, संजय निंबाळकर, कुलस्वामिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन सुनिल चव्हाण, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. धीरज पाटील, आदीत्य गोरे, संजय दुधगावकर, अमित शिंदे, गोकुळ शिंदे, माजी नगरसेवक धनंजय पाटील, महेंद्र धुरगुडे आदी उपस्थित होते. 

पुढील पाहणीसाठी रवाना 
तूळजापूर येथील कांक्रबा परिसरातून पाहणी केल्यानंतर शरद पवार यांचा ताफा लोहारा तालुक्यातील नुकसानीचे पाहणी करण्यासाठी राजेगाव आणि सास्तूरकडे वळाला. 

या गावांची करणार पाहणी 
शरद पवार हे मराठवाड्यातील नुकसानीचे पाहणी करीत आहेत. यामध्ये सास्तूर, राजेगाव, उमरगा, उजनी, पाटोदा, करंजखेडा या गावांतील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. 

खूप मोठी अपेक्षा निर्माण 
शेतीच्या नुकसानीचा जाण असलेला नेता नुकसानीचे दौरा करायला मराठवाड्यात आला आहे. त्यामुळे शेतकर्यांना या दौर्यानंतर चांगली मदत मिळेल. जगण्यासाठी पुन्हा बळ मिळेल अशी आशा लागली आहे. 

शेतकरी म्हणतात... 
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या परिस्थितीची आणि शेतकरी बांधवांची अवस्था याबाबत मी शरद पवार साहेबांना व्यथा मांडली. पावसाने आमचे सगळंच नेल आले. होत नव्हत देखील गेल. आता साहेबांच्या या दौर्याने आम्हाला मदतीची आशा आहे. - व्यंकट झाडे, शेतकरी, कांक्रबा. 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com