शेंद्र्यातून चोरलेले केबल गुजरातेत विक्रीला नेले : असा लागला तपास

सुशेन जाधव
शनिवार, 21 डिसेंबर 2019

शेंद्रा एमआयडीसी परिसरातील शापूरजी पालनजी कंपनीच्या प्रोजेक्‍ट मॅनेजर वसीम खुर्शिद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कंपनीच्या कामासाठी ऍल्युमिनिअम तारेचे ड्रम मागवण्यात आले होते व ते गोडाऊन व साईटवर ठेवण्यात येत होते.

औरंगाबाद : शेंद्रा एमआयडीसी परिसरातून तब्बल पावणेदोन कोटींच्या ऍल्युमिनियम तारेच्या 19 ड्रमची चोरी झाली होती. सदर चोरीचे केबल गुजरातमध्ये विकण्यासाठी नेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सय्यद ऊर्फ पप्पू जमालोद्दीन गफार व शेख अजहर शेख फतरू असे त्या चोरी प्रकरणतील आरोपींची नावे आहेत. 

याप्रकरणी शेंद्रा एमआयडीसी परिसरातील शापूरजी पालनजी कंपनीच्या प्रोजेक्‍ट मॅनेजर वसीम खुर्शिद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कंपनीच्या कामासाठी ऍल्युमिनिअम तारेचे ड्रम मागवण्यात आले होते व ते गोडाऊन व साईटवर ठेवण्यात येत होते. सात सप्टेंबर 2019 रोजी सकाळी दहाच्या सुमारास फिर्यादीने साईटवर पाहणी केली असता, केबलची चोरी झाल्याचे लक्षात आले. 

क्लिक करा - कैद्याला एकदम लटकवत नाहीत फासावर, अशी असते पूर्वतयारी 

या प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरून करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन सय्यद ऊर्फ पप्पू जमालोद्दीन गफार (29) व शेख अजहर शेख फतरू (35, रा. पीरगबावडी, ता. घनसावंगी, जि. जालना, ह.मु. राहता, जि. अहमदनगर) यांना 15 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती, तर दोघांनाही गुरुवारपर्यंत (ता.19) पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्याने दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, दोघा आरोपींच्या पोलिस कोठडीमध्ये सोमवारपर्यंत (ता.23) वाढ करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रुहिना अंजुम यांनी दिले. 

मृत्यूदंड - कसा तयार होतो फाशीचा दोर? काय म्हणतात त्याला...

असा लागला तपास 

आरोपींनी संबंधित चोरीचा माल तौकीर हुसेन याला विकला असून, तौकीर हुसेन याने संबंधित माल गुजरातमध्ये नेल्याचे सीसीटीव्हीसह इतर तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे तौकीर हुसेन याला अटक करून मुद्देमाल जप्त करणे; तसेच ज्या वाहनांतून चोरीचा माल नेला त्याबाबत आरटीओकडून माहिती मिळवणे बाकी आहे. आरोपींच्या पोलिस कोठडीमध्ये वाढ करण्याची विनंती सहायक सरकारी वकील जनार्दन जाधव यांनी न्यायालयात केली.

हेही वाचा -  Exclusive : पुण्याचा पोलिस देऊ शकतो निर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shendra MIDC Aluminium Cable Theft To Sell in Gujrat