esakal | शिवसेना नेते चंद्रकांत खैरे काय म्हणाले, वाचा...
sakal

बोलून बातमी शोधा

Shiv Sena leader Chandrakant Khair's reaction
  • शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न होतेय साकार 
  • शेवटी सत्याचा विजय झाला 
  • शरद पवारांचेही योगदान मोठे 
  • वेळ गेल्याने राज्याचे नुकसान 

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे काय म्हणाले, वाचा...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद -  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलेला शब्द पूर्ण करण्याची आता वेळ आली आहे. शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार होणार असून, शेवटी सत्याचा विजय झाला आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी ही भावना व्यक्‍त केली आहे. 

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सत्ता स्थापनेवरून सुरू असलेल्या सत्ताकारणावरून कुरघोड्या, जुळवाजुळव, खलबते सुरू आहेत. मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजपमधील युती संपुष्टात आल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू होत्या. सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी ते जाणार तोच शनिवारी (ता.23) भल्या सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना सोबत घेऊन सत्तास्थापनेसाठी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणला होता. यानंतर बहुमत सिद्ध करण्यासाठी जुळवाजुळव करण्याला सुरवात झाली; मात्र मध्ये घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर अखेर बहुमताच्या आकडा गाठण्याची शक्‍यता नसल्याने आधी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर नंतर देवेंद्र फडणवीस यांना मंगळवारी (ता.26) राजीनामा द्यावा लागला.

संबंधित बातमी -   'ऑपरेशन लोटस'वर 'पवार पॉवर' भारी !

या पार्श्‍वभूमीवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे प्रतिक्रिया व्यक्‍त करताना म्हणाले, "शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस आघाडीचे लवकरच सरकार राज्यात येईल. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांचेही मोठे योगदान आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शब्द दिला होता की, एक न एक दिवस या महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री करीन आज तो शब्द खरा करून दाखवण्याची वेळ आली आहे.'' 

हेही वाचा - कुटुंबातील 'या' व्यक्तीमुळे वळले अजित पवारांचे मन अन् दिला राजीनामा

शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न लवकरच सत्यात

शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न लवकरच सत्यात येण्याची वेळ आली आहे. सत्तेच्या
स्थापनेवरून बहुमत नसताना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन यात महाराष्ट्राचा वेळ गेला. यामुळे राज्याचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने नुकसान झाले त्यांना नुकसानभरपाई मिळू शकली नाही. अशाही परिस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख तसेच शिवसेनेच्या आमदारांनी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना दिलासा देण्याचे काम
केले आहे. सरकार कोसळले हा सत्याचा विजय झाला असल्याचे श्री. खैरे यांनी मत व्यक्‍त केले. 

loading image