फोटो
फोटो

नांदेडात शिवसेना, राष्ट्रवादी, कॉँग्रेसचा जल्लोष.

नांदेड : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची तसेच शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेसच्या सहा नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ मुंबईला शिवतिर्थावर गुरुवारी (ता. २८) सायंकाळी शपथ घेतली. त्यानंतर नांदेड शहर आणि जिल्ह्यामध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी फटाके फोडून घोषणा देत लाडू, पेढे वाटप करण्यात आले.


शिवसेना, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर सायंकाळी शिवतिर्थावर राज्यपालांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांनी, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जयंत पाटील आणि छगन भुजबळ तसेच कॉँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत या सहा नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. हा शपथविधी सोहळा पाहण्यासाठी नांदेडहून शिवसेना, कॉँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते बुधवारी वाहनासह रेल्वे आणि विमानाने मुंबईला रवाना झाले होते.


शपथविधी सोहळा सुरु झाल्यानंतर नांदेडमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. शहरातील श्रीनगर, तरोडा भागातील शिवमंदिर, महाराणा प्रताप चौक, अण्णा भाऊ साठे चौक, सिडको आदी भागात शिवसेना, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली तसेच कार्यकर्त्यांनी पेढे, लाडू आणि साखरेचे वाटप करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी काही ठिकाणी बॅण्डबाजा लाऊन स्वागत करण्यात आले.


श्रीनगर भागात कॉँग्रेसच्या माजी महापौर मंगला निमकर, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कल्पना डोंगळीकर, शिवसेनेच्या राजश्री पाटील यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेनेचे जितेंद्र सुरनर, विजय गुंजकर आदींनी आयोजन केले होते. तरोड्यात शिवमंदिर येथे गोविंद देशमुख तरोडेकर यांच्यासह गजाजन देशमुख, पुरभाजी तुपेकर, सुरत सुरणेकर, बालाजी पाटील हुंबाड, बाळू कोलते, अशोक देशमुख, अविनाश केंद्रे, गोपीनाथ देशमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. आण्णा भाऊ साठे चौक येथे डॉ. निकिता चव्हाण, निकिता शहापूरवाड, दिपाली उदावंत, राजू गुंडावार, जया कंधारे, कविता वानखेडे, सुशीलाबाई सातपुते, निर्मला शर्मा आदींनी जल्लोष साजरा केला.


महाराणा प्रताप चौक येथे दर्शनसिंघ सिद्धू, रमेश कोकाटे, प्रकाश राठोड, मनोज ठाकूर, अशोक पाटील वांगीकर, अंकुश कोकाटे, अरुण गारोडे, रवी चव्हाण, मन्मथ स्वामी, कैलास कल्याणकर, संदीप राठोड, गणेश जाधव, मंगेश वानखेडे, बबलू ठाकूर, बालाजी अडकिणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com