esakal | शिवसेनेच्या भगव्या झेंड्याचे शुद्धीकरण करणे गरजेचे : आशिष शेलारांचा टोला
sakal

बोलून बातमी शोधा

aashish shelar.jpg

शिवसेनेच्या भगव्या झेंड्याचे शुध्दीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे, असा टोला भाजपा नेते तथा आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावला. ते औरंगाबादेत गुरुवारी (ता.19) पत्रकार परिषदेत बोलत होते. 

शिवसेनेच्या भगव्या झेंड्याचे शुद्धीकरण करणे गरजेचे : आशिष शेलारांचा टोला

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : शिवसेनेची मनुवृत्ती इंग्रजाच्या काळातील आहे. त्यांची मनोधारणा गोऱ्या लोकांच्या कामासारखीच असून कार्यपद्धती दंडुकेशाही, लोकशाही मुल्य विरोधी आहे. आता शिवसेनेच्या झेंड्याबरोबर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे आजूबाजूला लागल्याने त्यांनी हिंदुत्व सोडले. बाळासाहेब ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिकेला तिलांजली देत स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी करणाऱ्या काँग्रेस पक्षाबरोबर साथगाठ केली. त्यामुळे शिवसेनेच्या भगव्या झेंड्याचे शुध्दीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे, असा टोला भाजपा नेते तथा आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावला. ते औरंगाबादेत गुरुवारी (ता.19) पत्रकार परिषदेत बोलत होते. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

मराठवाडा पदवीधर निवडणूकीतील भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी आमदार शेलार औरंगाबाद दोऱ्यावर आले आहेत. सकाळी त्यांनी वकिलांचा मेळावा घेतला. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मुंबई महापालिका निवडणूकीच्या अनुषंगाने झालेल्या भाजपच्या बैठकीत महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकाण्याची घोषणा करण्यात आली. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हा झेंडा युनियन जॅक असल्याची टिका केली होती. संजय राऊत यांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना आशिष शेलार यांनी शिवसेनेला चांगलेच धारेवर धरले आहे. ते म्हणाले की, शिवसेनेची मनुवृत्ती इंग्रज काळातील आहे. त्यांची मनोधारणाही इंग्रजासारखी असल्याचे सांगत कॉग्रेस आणि राष्ट्रवादीचा झेंडा शिवसेनेसोबत लागल्यामुळे आता शिवसेनेच्या भगव्या झेंड्यांचे शुद्घीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

संस्थाचालकांना त्रास देणेच सतीश चव्हाणाचे काम 
यावेळी महाविकास आघाडीकडून उमेदवार असलेल्या आमदार सतीश चव्हाण यांनी शिक्षण संस्था जरजर केल्या. लॉकडाऊन काळात ३० शिक्षकांचे मृत्यु झाले. १६ शिक्षकांनी आत्महत्या केल्या. अशा परिस्थिती या शिक्षकांना एक पैसाचीही मदत महाविकास आघाडी सरकारने केली नाही. यासाठी आमदार सतीश चव्हाण यांनी काहीच पाऊले उचले नाही. एक वर्ष पुर्ण झाले तरी शाळांना अनुदान मिळाले नाही. केवळ संस्थाचालकांना त्रास देण्याचे काम चव्हाण यांनी केला असल्याचे आरोपही शेलार यांनी केला. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अन्यथा जयसिंगरावांनी भयंकर भाषेत उत्तर देऊ 
जयसिंगरावाना पक्षाने एवढ्या उंचीवर नेले. त्यांनी स्वत:ची उंची बघूनच पक्षाच्या उंची बद्दल बोलावं हे अतिशय विन्रमतेने त्यांना सांगतो. आमच्या बरोबर होता. तेव्हा आमचे नेते होता. पक्षाने त्यांना जे द्यायचे ते सर्व दिले. यापुढेही त्यांचा सन्मान ठेऊ असे अश्‍वासन प्रदेशाध्यक्ष चंद्राकांत दादा पाटील यांनी काही दिवसांपुर्वी दिले होते. आजही संयम आमच्या सहकाऱ्यांनी ठेवला आहे. यापुढे पक्षाविरोधातील वक्तव्य किंवा बदनामी कराल तर त्यापेक्षाही भयंकर भाषेत उत्तर दिले जाईल. असेही आमदार आशिष शेलार यांनी सांगितले. "मी करीत तो कायद्या हे भाजपात चालू शकत नाही. येणाऱ्या नवीन पिढीला संधी देणे हे आपले काम बाळगून या ठिकाणी पक्ष चालत असतो. जे शिरीष बोराळकर त्यांच्या निवडणूकीचे प्रचार प्रमूख होते. त्यांना पक्षाने संधी दिल्यावर त्यांना जयसिंगरावानी आर्शिवाद देणे अपेक्षित होते. पण जयसिंगरावानी पक्ष बदलला. म्हणून त्यांच्या भूमिका बदलल्या असतील. तरी मराठवाड्यातील नागरिकांवर आणि मतदारांचा भरवसा भाजपच्या बाजूनेच राहिल. असेही शेलार म्हणाले. यावेळी खासदार डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर, अनिल मकरिये, विजय औताडे, भगवान घडामोडे, किशोर शितोळे. कचरू घोडके उपस्थित होते. 

(संपादन-प्रताप अवचार)