धक्कादायक : नांदेडातून पळालेल्या 90 भावीकांविरुद्ध गुन्हा

प्रल्हाद कांबळे
Tuesday, 21 April 2020

साडेतीन हजार भाविकांपैकी ९० भाविक प्रत्येकी ७० हजार रुपये भाडे देऊन सहा चारचाकी वाहनाने पंजाबकडे पळून गेले होते. त्यांना मध्यप्रदेशातील इंदौरमध्ये अडविण्यात आले आहे.

नांदेड : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे नांदेडमध्ये अडकून पडलेल्या जवळपास साडेतीन हजार भाविकांपैकी ९० भाविक प्रत्येकी ७० हजार रुपये भाडे देऊन सहा चारचाकी वाहनाने पंजाबकडे पळून गेले होते. त्यांना मध्यप्रदेशातील इंदौरमध्ये अडविण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध विनापरवाना आंतरराज्य प्रवास केल्याप्रकरणासह विविध कलमान्वये वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हल्लामोहल्लाच्या निमित्ताने येथील जगप्रसिद्ध सचखंड गुरुद्वाराच्या दर्शनासाठी आलेले जवळपास साडेतीन हजार भाविक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर नांदेडमध्ये अडकून पडले होते. पंजाबमध्ये गव्हाचा हंगाम सुरू होत असल्याने या भाविकांना विशेष रेल्वेने पंजाबमध्ये सोडावे अशी मागणी केंद्रीय अन्नप्रक्रिया मंत्री श्रीमती हसिमतकौर बादल यांनी केली. 

हेही वाचा‘कोरोना’च्या लढाईत शिक्षकही उतरले...

गुरुद्वारामध्ये राहण्याची व जेवणाची सोय 

परंतु गृहमंत्रालयाकडून कोणतेही आदेश न मिळाल्यामुळे नांदेड जिल्हा प्रशासनाने त्यांना पंजाबमध्ये पाठविण्यास स्पष्ट नकार दिला होता. या सर्वांची येथील गुरुद्वारामध्ये राहण्याची व जेवणाची सोय केली होती. असे असतानाही ता. १६ एप्रिल ते ता. १८ एप्रिल या कालावधीत ९० यात्रेकरू प्रत्येकी ७० हजार रुपये भाडे देऊन सहा चारचाकी वाहनाने पंजाबला पळून गेले होते. त्यांना मध्यप्रदेशातील इंदौरमध्ये अडविण्यात आले आहे.

वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा 

याबाबतची माहिती मिळताच वजिराबाद पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध भादविच्या २७०, १८८ कलम ५१ (बी) तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ कलम ११ महाराष्ट्र कोवीड - १९विनीयमन २०२० अन्वये यात्रेकरू सुरजीतकौर, कुलदीपसिंग, गुरविंदरसिंग, हरदीपसिंग, मनजीतकौर, कुलविंदरकौर व इतर ९० भाविक तसेच (एमएच२६-एएफ-८८०८),  एमएच४८- पी- ४२८५) व इतर चार वाहनांचे चालक व मालकाविरुद्ध लॉकडाउन आणि संचारबंदीमध्ये शासनाची परवानगी न घेता प्रवास करुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात निष्काळजीपणा केल्याबद्दल गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

येथे क्लिक करा परभणीतील उद्योग अडकले ‘कंटेंटमेंट झोन’मध्ये !

तब्बल ९० भाविक शहराच्या बाहेर कसे व कुठून गेले

नांदेडच्या गुरूद्वारात राहणारे तब्बल ९० भाविक शहराच्या बाहेर कसे व कुठून गेले. असा प्रश्‍न उपस्थित होत असताना त्यांना बाहेर कोणी काढून दिले याचा शोध पोलिस घेत आहेत. पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी या प्रकरणाची गंभीर देखल घेतली आहे. या प्रकरणाची फिर्याद पोलिस नाईक माधव मरिकुंटेलु (बन १३३९) यांनी वजिराबाद पोलिस ठाण्यात दिली. यावरुन पोलिस निरीक्षक संदीप शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नायक अनिल झांबरे हे तपास करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shocking: Crime against 90 fugitives from Nanded crime news