esakal | धक्कादायक...! परिक्षा पर्यवेक्षकांवर फौजदारी गुन्हे 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

जिल्हाधिकारी यांच्या कॉपी मुक्ती अभियानाला हरताळ फासणऱ्या विविध केंद्रावरील पर्यवेक्षकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पर्यवेक्षकावर फौजदारी गुन्हे दाखल होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने पर्यवेक्षकांसह परिक्षा केंद्र प्रमुखांचे व संचालकांचे धाबे दणाणले आहेत. 

धक्कादायक...! परिक्षा पर्यवेक्षकांवर फौजदारी गुन्हे 

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यातील ग्रामिण भागात सुरू असलेल्या दहावीच्या परिक्षा केंद्रात निष्काळजी व हयगय करून कॉपी करण्यास प्रतिबंध न घालणाऱ्या आणि जिल्हाधिकारी यांच्या कॉपी मुक्ती अभियानाला हरताळ फासणऱ्या विविध केंद्रावरील पर्यवेक्षकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पर्यवेक्षकावर फौजदारी गुन्हे दाखल होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने पर्यवेक्षकांसह परिक्षा केंद्र प्रमुखांचे व संचालकांचे धाबे दणाणले आहेत. 

नांदेड जिल्ह्यात परिक्षा केंद्र हे कॉपीचा बाजार बणला होता. ही वास्तव चित्र तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांनी कॉपी मुक्त अभियान राबविले होते. हा पॅटर्न संबंध राज्याने स्विकारला होता. परंतु त्या दरम्यान त्यांची बदली झाली आणि पुन्हा तीच परिस्थिती सुरू झाली.

जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांचा दणका

मात्र पुन्हा डॉ. विपीन इटनकर हे जिल्हाधिकारी म्हणून नुकतेच रुजू झाले. दहावी व बारावीच्या परिक्षा सुरू असतांना त्यांनी नायगाव येथील काही केंद्रांना भेटी दिल्या होत्या. त्यांनाही कॉपींचा सुळसुळाट दिसून आला. त्यानंतर त्यांनी यात गंभीर दखल घेऊन जिल्ह्यात कुठल्याच परिक्षेत कॉपी होणार नाही याची खबरदारी संबंधीत परिक्षा विभागाने घ्यावी अशा कडक सुचना दिल्या होत्या. मात्र तरीही काही परिक्षा केंद्रावर परिक्षार्थी कॉपी करत असल्याचे आढळून आले.

हेही वाचा‘उर्दू’ शाळेच्या मुख्याध्यापिकेसह सहशिक्षिकेवर....

बाऱ्हाळी येथील विद्याविकास माध्यमीक व उच्च माध्यमीक 

यानंतर त्यांनी थेट परिक्षा नियंत्रक व केंद्रप्रमुख यांना जबाबदार धरून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरू केले. जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी येथील विद्याविकास माध्यमीक व उच्च माध्यमीक विद्यालयात इंग्रजी पेपरच्या दिवशी कॉपी करतांना विद्यार्थ्यांना पकडले. यावेळी केंद्र संचालक अशोक रामय्याप्पा पंचगटे (वय ५२) यांच्या फिर्यादीवरुन चनबसप्पा माणिकप्पा बिरादार आणि सुनिल गोविंद मन्हवाड या दोघांविरुद्ध मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार जी. ए. वाघमारे करीत आहेत. 

मुक्रमाबाद येथील डॉ. भाऊसाहेब देशमुख विद्यालय

दुसऱ्या घटनेत मुक्रमाबाद (ता. मुखेड) येथील डॉ. भाऊसाहेब देशमुख विद्यालय येथील परिक्षा केंद्रावर कार्यरत असलेल्या पर्यवेक्षकांविरुद्ध बालाजी शिवाजीराव मोरे यांच्या फिर्यादीवरुन शुभम बालाजी टेकाळे, राजकुमार महादु भोसले, नामदेव केशवराव मलिले, भिमराव बाबूराव पाटील या पर्यवेक्षकांवर मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार जी. ए. वाघमारे करत आहेत. 

येथे क्लिक करारेल्वेतही आता इलेक्ट्रोनिक फंड ट्रान्सफरची सुविधा

अंबुलगा येथील माणिक प्रभु विद्यालय

तिसऱ्या घटनेत कंधार तालुक्यातील अंबुलगा येथील माणिक प्रभु विद्यालयात कॉपी करतांना अनेक विद्यार्थ्यांना पकडले. या शाळेचे मुख्याध्यापक सुभाष गीरे यांच्या फिर्यादीवरुन पर्यवेक्षक किरण अंबादास तपासे, साहेबराव तारु जाधव, दत्ता पोमा पवार, शादुल जिलानी तांबोळी आणि शिवाजी दीगंबर जोगपेटे यांच्याविरुद्ध कंधार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस नाईक श्री. जाधव करत आहेत. 

शेकापूर (ता. कंधार) येथील महात्मा फुले विद्यालय

त्यानंतर शेकापूर (ता. कंधार) येथील महात्मा फुले विद्यालय या केंद्रावरसुद्धा कॉप्यांचा सुळसुळाट दिसला. यावरून गोविंद देशमुख यांच्या फिर्यादीवरुन पर्यवेक्षक एम. डी. गीते, डी. व्ही. गुरवडे, पी. व्ही. घोरबांड, आस. आर. कोरकटे, डी. डी. गुदे आणि एस. यु. मोरे यांच्याविरुद्ध कंधार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास पोलिस नाईक श्री. टाकरस करत आहेत. 

हे उघडून तर पहा - PHOTOS : हिंदू-मुस्लिम एकता जोपासणारा ‘क्लब’, कोणता? ते वाचाच

पोस्ट बेसीक उच्च माध्यमीक विद्यालय गांधीनगर 

यासोबतच पोस्ट बेसीक उच्च माध्यमीक विद्यालय गांधीनगर (ता. कंधार) या परिक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक संजय धोंडीराम बेंबरे, पांडूरंग रघुनाथ मुंडे आणि मारोती गोविंद तेलंग यांच्यावर सुधाकर धोटे यांच्या फिर्यादीवरुन कंधार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार श्री. राठोड करत आहेत.

पानभोसी येथील नेताजी सुभाष चंद्र बोस

लोहा तालुक्यातील पानभोसी येथील नेताजी सुभाष चंद्र बोस या परिक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक राहूल शंकरराव भंडारे यांच्या विरुद्ध राजेश्‍वर पुरजवार यांच्या फिर्यादीवरून लोहा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार श्री. बगाडे करत आहेत. 

हानेगाव येथील जिल्हा परिषद हायस्कुल

देगलुर तालुक्यातील हानेगाव येथील जिल्हा परिषद हायस्कुलमध्ये परिक्षा केंद्रावर कार्यरत असलेले पर्यवेक्षक अन्सारी अन्वर इस्माईल शरिफोदीन यांच्याविरुद्ध केंद्रप्रमुख बालाजी खिंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मरखेल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास पोलिस नाईक श्री. वाघमारे करत आहेत.

ऐकावे ते नवलचमद्यपी चढला विद्युत खांबावर; पत्नीला केला फ्लाइंग किस
 
लोकमान्य टीळक माध्यमीक विद्यालय मरखेल 

लोकमान्य टीळक माध्यमीक विद्यालय मरखेल (ता. देगलुर) येथील पर्यवेक्षक एन. व्ही. पोतदार, व्ही. एम. मालुसरे, यु. एफ. सय्यद, एस. बी. पडीले, एस. जी. देशमुख आणि ए. पी. हत्तीनगरे यांच्याविरुद्ध मुख्याध्यापक पुंडलीक मोरे यांच्या फिर्यादीवरुन मरखेल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक फौजदार श्री. कुंभारे करत आहेत. 

 कुंटुर येथील माध्यमीक आश्रम शाळा

तसेच नायगाव तालुक्यातील कुंटुर येथील माध्यमीक आश्रम शाळेवर पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेले विनोद बालाजी इंगेवाड यांच्याविरुद्ध शाळेच संचालक शिवाजी पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुंटूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक श्री. नाईनवाड करत आहेत.