esakal | नांदेडमध्ये टेन्शन : पंजाबला पळालेले 9 भाविक कोरोनाग्रस्त, दोन राज्यांत गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

तरण- तारणमध्ये आढळलेले रुग्न हे नांदेडहून गेलेले आहेत किंवा नाहीत याची खात्री करण्यात येत आहे.

नांदेडमध्ये टेन्शन : पंजाबला पळालेले 9 भाविक कोरोनाग्रस्त, दोन राज्यांत गुन्हा दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : शिखांचे पवित्र स्थळ असलेल्या नांदेड येथे होला महल्ला या कार्यक्रमासाठी आलेले भाविक देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यावर अडकून पडले होते. त्यांच्या परत जाण्याची व्यवस्था प्रशासकीय पातळीवर केली जात असतानाही त्यातले ९० जण खासगी वाहनाने पळाले. त्यांच्यावर नांदेड आणि इंदूर येथे गुन्हेही दाखल झाले. पण पंजाबात प्रवेश केल्यानंतर त्यातील ९ जण कोरोनाग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नांदेडच्या भाविक आणि समाजात मोठी खळबळ माजली आहे. 

नांदेडच्या सचखंड गुरुद्वाराचे दर्शन आणि होला महल्ला कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंजाबमधून चार हजारांहून अधिक भाविक आले होते. ते पंजाबकडे जाण्याच्या तयारीत असतानाच देशभरात कोरोनाचा उद्रेक झाला. देशभर लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे हे यात्रेकरू नांदेडमध्ये अडकून पडले. 

संशयित आरोपीच कोरोनाग्रस्त, औरंगाबादेत ३० पोलिस क्वारंटाईन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून अखेर या यात्रेकरूंच्या पंजाबला परत जाण्याचा हालचाली झाल्या. पहिल्या टप्प्यात ५०० च्या आसपास यात्रेकरू नांदेड प्रशासनाने लक्झरी बसद्वारे पाठवले. त्यानंतर दुसऱ्या टप्यातील जवळपास साडेतीन हजार भाविकांना घेऊन जाण्यासाठी पंजाब सरकारने ७९ बस नांदेडला पाठविल्या होत्या. त्या बसद्वारे पंजामधील सर्व भाविक रवाना झाले.

पळालेले भाविक इंदूरला अडकले होते

१९ एप्रिलला रात्री ९० भाविक खासगी चारचाकी वाहनांद्वारे पळाले होते. या ९० भाविकांनी प्रत्येकी ७० हजार रुपये भाडे देऊन सहा वाहने केली आणि पळाले. त्यामुळे त्यांच्यावर नांदेडच्या वजिराबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. हे सर्व भाविक रेड झोनमध्ये असलेल्या मध्यप्रदेशातील इंदूर येथेही अडकले होते. तिथेही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

सहा महिन्यांच्या बाळाचे शिर कापून फेकले, कुत्र्याने पळवले

त्यानंतर हे भाविक तेथून पुढे आपल्या जिल्‍यात गेल्यानंतर त्यापैकी नऊ जणांना कोरोना झाल्याचे उघडकीस आले. ही माहिती नांदेड पोलिसांना व प्रशासनाला समजताच त्यांचे धाबे दणाणले. याबाबत त्या यात्रेकरुंची कसून चौकशी सुरू असून, संत बाबा नरेंद्रसिंग व संतबाबा बलविंदरसिंग यांच्याशी संपर्क साधला असल्याचे पोलिस अधीक्षक विजयुकमार मगर यांनी सांगितले. 

उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की तरण तारणमध्ये आढळलेले रुग्ण हे नांदेडहून गेलेले आहेत किंवा नाहीत याची खात्री करण्यात येत आहे. जर ते नांदेडहून गेलेले असतील तर ते नांदेडमधील लंगरसाहिब गुरुद्वारामध्ये थांबले होते त्या ठिकाणाची कसून तपासणी करून त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. 

पैठण तालुक्यात पोलिसांवर दगडफेक, सामुदायिक प्रार्थनेला केला प्रतिबंध

पंजाबच्या सीमेवर पहिल्या व दुसऱ्या

टप्प्यातील यात्रेकरुंची तपासणी होणार

नांदेड येथून परतलेल्या यात्रेकरूपैकी नऊ जणांना कोरोना विषाणू संसर्गाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान मंगळवारी (ता. २८) रात्री उशिरापर्यंत पंजाबकडे रवाना झालेल्या अडीच हजार यात्रेकरूंचा प्रवास सुरू झाला असून, पंजाब सरकारने राज्याच्या सीमेवरच किंवा ते पोहोचतील त्या गावाला वैद्यकीय पथक पाठवले जाणार आहे. या सर्वांची चाचणी करण्यात येणार आहे. पंजाब पोलीस, सर्व उपविभागीय अधिकारी, तसेच आरोग्य व्यवस्था या सर्वांची टीम त्या ठिकाणी तैनात करण्यात आली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.