Sillod Accident: सिल्लोडमध्ये भीषण अपघात! महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू, दोघे गंभीर

Rameshwar Tadale Dies in Three Vehicle Crash Near Sillod: सिल्लोडमध्ये भीषण अपघात! तीन वाहनांची धडक; ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू, दोघे गंभीर
Sillod Highway Accident Three Vehicle Collision at Kerhala Phata Claims Tractor Driver Life Two Drivers Seriously Injured in Crash

Sillod Highway Accident Three Vehicle Collision at Kerhala Phata Claims Tractor Driver Life Two Drivers Seriously Injured in Crash

esakal

Updated on: 

-महेश रोडे

निल्लोड: छत्रपती संभाजीनगर–सिल्लोड महामार्गावरील सिल्लोड तालुक्यातील केऱ्हाळा फाटा येथे हॉटेल मामीसमोर शनिवारी (दि. १७) रात्री आठ वाजेच्या सुमारास ट्रॅक्टर, कंटेनर आणि आयशर या तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाला, तर कंटेनर चालक आणि आयशर चालक गंभीर जखमी झाले. अपघातामुळे महामार्गावर सुमारे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वडोद बाजार पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com