esakal | कहर पाण्याचा : ३६ तासांपासून कळंब तालुक्यातील सहा गावे अंधारात !  
sakal

बोलून बातमी शोधा

उस्मानाबाद पाऊस.jpg

गेल्या छत्तीस तासापासून नायगाव (ता. कळंब) परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाल्याने सहा गांवातील नागरिकांना दोन रात्री अंधारात काढाव्या लागल्या आहेत. वीज नसल्याने सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे सहा गावातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

कहर पाण्याचा : ३६ तासांपासून कळंब तालुक्यातील सहा गावे अंधारात !  

sakal_logo
By
वैभव शितोळे

नायगांव (उस्मानाबाद) : गेल्या छत्तीस तासापासून नायगाव (ता. कळंब) परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाल्याने सहा गांवातील नागरिकांना दोन रात्री अंधारात काढाव्या लागल्या आहेत. वीज नसल्याने सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे सहा गावातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
नायगांवसह पाडोळी, वडगांव, वाठवडा, पिंपरी (शि) येथील सहा गांवाला पाडोळी येथील सबस्टेशन मधुन विज पुरवठा केला जातो. मंगळवारी (ता.१३) मध्यरात्री खंडीत झालेला विज पुरवठा अजूनही सुरुळीत न झाल्याने नागरीक त्रस्त आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मोबाईल, पाणी बंद
छत्तीस तासापासून वीजपुरवठा खंडीत असल्यामुळे येथील मोबाईल टॉवर बंद आहेत. यामुळे मोबईलची रेंज देखील गायब झाली आहे. सर्वांचेच मोबाईल चार्जिंग अभावी बंद आहेत.पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रना बंद आहेत. एकुनच विजे अभावी अनेक समस्यां निर्माण झाल्या आहेत. यावरून महावीतरणचा भोंगळ कारभार दिसून येत आहे. 

महावितरणने लवकरात लवकर  याकडे लक्ष देऊन त्वरित वीजपुरवठा सुरूळीत करावा अशी मागणी सहा गावातील नागरिक करत आहेत.गेल्या दोन दिवसा पासून महवितरणचे अधिकारी परीसरात बिगाड कुठे झाला यासाठी  फिरत आहेत. पण सतत येणा-या पावसाच्या सरीमुळे त्यांना अडथळा येत आहे. अशी माहीती लाईनमेन भिमराव लोकरे यांनी दिली  या संदर्भात वरीष्ठ अधिका-यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. 

(संपादन-प्रताप अवचार)