esakal | आधार केंद्रातील आजी आजोबांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य, भरपेहराव आहेराने गेले भारावून  
sakal

बोलून बातमी शोधा

aadharwad.jpg

उमरगा : दिवाळी सणानिमित्त दाळींबच्या बाबा जाफरी सोशल फाऊंडेशनचा अनोखा उपक्रम

आधार केंद्रातील आजी आजोबांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य, भरपेहराव आहेराने गेले भारावून  

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (उस्मानाबाद) : उमरगा तालूक्यातील दाळींब येथील बाबा जाफरी सोशल फाऊंडेशनच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या आधार सेवा केंद्रातील जेष्ठ नागरिकांना दिवाळी सणाच्या निमित्ताने भरपेहराव आहेर करण्यात आले. रविवारी (ता.१५) तहसीलदार संजय पवार यांच्या उपस्थितीत हा अनोखा उपक्रम घेऊन जेष्ठांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
गेल्या एक वर्षापासून बाबा जाफरी सोशल फाऊंडेशनच्या वतीने आधार सेवा केंद्रातील जेष्ठ नागरिकांसाठी दाळिंब येथे भोजन सेवा केंद्र स्थापन करण्यात आले. त्या ठिकाणी गरजू असलेल्या ४२ वृद्ध पुरूष, महिलांना दोन वेळेचे मोफत जेवण दिले जाते. शिवाय प्रत्येक सणासुदीला विशिष्ट खाद्य पदार्थ तयार करुन जेष्ठांना दिले जाते. त्यामुळे जेष्ठांच्या चेहऱ्यावर सणाचा आनंद दिसून येतो. दिवाळीच्या सणाची आनंद हा विशेष असतो. तो आनंद जेष्ठांना मिळावा म्हणून जेष्ठ नागरिकांना कपडयाचा पूर्ण आहेर, महिलांना साडी - चोळीचा आहेर करण्यात आला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

रविवारी एका कार्यक्रमात 
तहसीलदार संजय पवार यांच्या हस्ते जेष्ठांना आहेर करण्यात आला. बाबुराव टिंकाबरे अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबा जाफरी, युसूफ मुल्ला, सचिन बिद्री, भूमिपुत्र वाघ, मधुकर गुरुजी, डोंगरे गुरुजी, जब्बार पटेल, इकबाल चौधरी, पोलीस पाटील अश्विनी वाले, बसवराज सारणे, गणेश इगवे आदींची यावेळी उपस्थिती होती. या वेळी बोलताना तहसीलदार श्री. पवार यांनी बाबा जाफरी सोशल फाऊंडेशनच्या उपक्रमाचे कौतूक करून समाजामध्ये जेष्ठांप्रती आदरभाव जपला पाहिजे असा संदेश दिला. दरम्यान या वेळी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या मंगेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला. माऊली सेवा संघ यांनी फराळाची व्यवस्था केली होती.


"सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी बाबा जाफरी सोशल फाऊंडेशनचे कार्य सुरू आहे. अनेक गरिब कुटुंबावर कटू प्रसंग आल्यानंतर त्यांना मानसिक धैर्य आणि आर्थिक मदत देण्यात आली. गरजूवंत जेष्ठांना उतारवयात आधार मिळावा म्हणुन मोफत भोजन केंद्र सुरू केले. दिवाळी सणानिमित्त नवीन कपडे व फराळाची सोय केली. जेष्ठांसाठी केलेल्या मदतीमुळे आत्मिक समाधान मिळते.- बाबा जाफरी.