esakal | सौरकृषी पंप योजनेला भूजल सर्वेक्षणाची आडकाठी, शेतकरी राहणार वंचित!  
sakal

बोलून बातमी शोधा

solar-krushi-pump-yojana.jpg

शेतकऱ्याना शेतीसाठी दिवसा पाणी मिळावे यासाठी शासनाने मुख्यमंत्री सौरकृषी पंप योजना घोषित केली आहे. पण भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या आडकाठीमुळे सौरकृषी पंप मिळणे कठीण असल्याचे समोर येणार आहे.

सौरकृषी पंप योजनेला भूजल सर्वेक्षणाची आडकाठी, शेतकरी राहणार वंचित!  

sakal_logo
By
दिलीप गंभीरे

कळंब (उस्मानाबाद) : शेतकऱयांच्या उन्नतीसाठी मुख्यमंत्री सौरकृषी पंप योजना घोषित करण्यात आली आहे. वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने २०१७ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात मारलेली खुंटी निघायला तयार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱयांना मुख्यमंत्री सौरकृषी पंप योजनेमधून कृषिपंप मिळणे मुस्किल असल्याची माहिती समोर आली आहे.  

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

जिल्ह्यात दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे बहुतांश गावातील विहिरी, कुपनलिकेच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून करण्यात आलेल्या २०१७ मधील सर्वेक्षणाच्या आधारामुळे गावात ६० टक्के पेक्षा कमी पाणी उपसा असल्याने जिल्ह्यातील २९६ गावाचा सुरक्षित पाणलोट क्षेत्रात समावेश करण्यात आला. सुरक्षित पाणलोट क्षेत्रात समावेश असलेल्या गावातील शेतकऱयांना कृषीपंप मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असला. तरी उर्वरित गावातील शेतकऱ्याचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. महत्वाची बाब म्हणजे २०१६-१७ मध्ये संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परस्थिती होती. नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता. आता दोन वर्षांपासून चांगला पाऊस झाला आहे .त्यामुळे जलस्रोतात वाढ झाली आहे. शेतकऱ्याना शेतीसाठी दिवसा पाणी मिळावे यासाठी शासनाने मुख्यमंत्री सौरकृषी पंप योजना घोषित केली आहे. पण भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या खुंटीमुळे सौरकृषी पंप मिळणे कठीण असल्याचे दिसून येत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

टंचाईग्रस्त गावेही सुरक्षित क्षेत्रात;
बहुतांश गावात दुष्काळसदृश्य परस्थिती होती.अनेक गावात टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला होता.अशा बहुतांश गावाचा सुरक्षित पाणलोट क्षेत्रात समावेश आहे.त्यामुळे सर्वेक्षणबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

आढावा बैठकीत खासदारांनी खडसावले
६ अक्टोंबरला खासदार ओमप्रकाश राजेनींबाळकर,आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण अधिकारी,सौरकृषी पंप योजनेची अंमलबजावणी करणारी यंत्रणा यांची बेठक घेतली होती. सुरक्षित पाणलोट क्षेत्रात दुष्काळग्रस्त गावाचा समावेश झाल्याने चांगलेच खडसावण्यात आले होते.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

फेरसर्वेक्षणाची मागणी

जिल्ह्यात मुबलक प्रमाणात पाऊस झाल्याने पाणी पातळीत वाढ झाली आहे.भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने केलेल्या सर्वेक्षणाबाबत शेतकरी वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.त्यामुळे फेरसर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आल्याचे आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी सांगितले.

(संपादन-प्रताप अवचार)