
सेलूत सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प २२ गावांतील शेतकर्यांना ठरतोय वरदान
सेलू (जि.परभणी) : तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत अठरा एकर पडीक जमिनीवर सौरउर्जेवर (Solar Energy) दररोज २० हजार युनिट वीज निर्मितीचा प्रयोग यशस्वी केला आहे. या वीज निर्मितीमुळे वालूर (ता.सेलू) परिसरातील बावीस गावांतील शेतकऱ्यांच्या कृषीपंपाला दिवसभर वीजपुरवठा होण्यास मदत होत आहे. शेतकर्यांच्या कृषी पंपाचा दिवसभर वीजपुरवठा सुरळीत राहवा. यासाठी शासनाने मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेअंतर्गत कृषि वीज वाहिन्याची जोडणी असलेल्या वीज उपकेंद्रापासून पाच किलोमीटर (Parbhani) अंतरावर पडीक शेतात वीज निर्मिती करून ती महावितरणला विकण्याची संधी शेतकरी व उद्योजकांना उपलब्ध करून दिली आहे. या योजनेअंतर्गत हातनूर-वालूर रस्तालगत प्रगतशील शेतकरी (Farmer) अशोक काकडे आणि उद्योजक आर. बी. घोडके या दोन शेतकर्यांनी प्रत्येकी नऊ एकर जागेत स्वतंत्रपणे दोन वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येकी दोन मेगावॅटच्या प्रकल्पास मंजुरी मिळविली. (Solar Energy Provide Electricity To 22 Villages Farmers In Selu Of Parbhani)
हेही वाचा: मराठवाड्याचे सुपूत्र आनंद भालेराव राजस्थान केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरुपदी
त्यानंतर निर्मिती केलेली वीज जवळच्या वालूर ११ केव्ही उपकेंद्रास देण्याबाबत महावितरणशी (Mahavitaran) करार केला. कमी काळात हे काम पूर्ण करत एका वीज निर्मिती केंद्रावर १२० टेबलवर सात हजार २०० सौरप्लेट लावून हा प्रकल्प सप्टेंबर-२०२१ पासून कार्यान्वित झाला. तर दुसऱ्या सौर विज निर्मिती केंद्रावर १२० टेबलवर सात हजार ५६० सौरप्लेटचा प्रकल्प ४ जानेवारीपासून कार्यान्वित झाला आहे. या विज निर्मिती प्रकल्पामूळे वालूर विज उपकेंद्रातील २२ गावातील गावठाण व कृषीपंपाना वीज पुरवठा केला जात आहे. सदरिल प्रकल्प हा मुख्यमंत्री सौरकृषी वीजवाहिनी योजनेतून असला तरी मात्र शेतकर्यांना हा प्रकल्प स्वखर्चातून उभारावा लागत आहे. शासनाचे कुठल्याही प्रकराचे अनुदान या योजनेला नसल्याने हा प्रकल्प उभारणीसाठी शेतकर्यांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. या योजनेत शेतकर्यांसोबत २५ वर्षाचा करार करण्यात येत आहे. तर एका प्रकल्पासाठी शेतकर्यांना कोट्यावधीचा खर्च येत असून केवळ करात सवलत शासनाकडून देण्यात येते असे असतांनाही या दोन शेतकर्यांनी तालुक्यात पहिला प्रकल्प उभारून शेतकर्यांचे हित जोपसण्याचा प्रयत्न केला आहे.
हेही वाचा: 'जन्मापूर्वीचा इतिहास शिवसेनेचे इतिहासाचार्य संजय राऊतांना माहिती नसावा'
दिवसभर वीजपुरवठा
वालूर (Selu) शिवारातील माझ्या स्वत:च्या नऊ एकर पडीक जमिनीत तसेच आमचे सहकारी उद्योजक आर. बी. घोडके यांच्या नऊ एकर अशा अठरा एकर शेतात सौरऊर्जा वीज निर्मिती प्रकल्प उभारणी केली आहे. दिवसभरात दोन्ही प्रकल्पातून प्रत्येकी दोन मेगावॅटप्रमाणे एकुण चार मेगावॉट वीजनिर्मिती क्षमतेनुसार २० हजार युनिट निर्मिती सुरू असून ती वालूर ११ केव्ही उपकेंद्रास दिली जाते. या वीज निर्मितीमुळे दिवसभर वीजपुरवठा होतो. त्यामुळे शेतकऱ्यांची रब्बी व फळबागा फुलल्या आहेत. मात्र शेतकर्यांची वीज केवळ तीन रूपये २९ पैसे दराने खरेदी केली जात आहे. तर नवीन प्रस्ताव केवळ तीन रूपयांनाच वीज खरेदी करण्यात येत असल्याने राज्यातील कूठल्याही शेतकर्यांनी शासनाकडे नवीन प्रस्ताव सादर केला नाही. शासन चंद्रपुर येथून चढ्यादराने विज खरेदी केल्या जाते. यामध्ये वीज गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून तो दर सहा रूपये ५० पैसे एवढा जातो. मात्र शेतकर्यांची विज शासन तूटपूंज्या भावाने खरेदी करत असल्याची माहिती शेतकरी अशोक काकडे यांनी दिली.
Web Title: Solar Energy Provide Electricity To 22 Villages Farmers In Selu Of Parbhani
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..