

Family Brutality: Son and Daughter-in-Law Assault Elderly Parents Over Property Greed
राजेंद्र व्यास
गंगापूर : जमिनीच्या वाटणीच्या वेळी पैसे दिले नाहीत या कारणावरून मोठ्या मुलाने पत्नी व साथीदारांच्या मदतीने आई-वडील व भाव-भावजयला लोखंडी गजाने बेदम मारहाण केल्याची घटना गंगापूर तालुक्यातील पुरी येथे घडली. या प्रकरणी वडिलांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.