
भोकरदन : अवघ्या एक महिन्याचा असताना वडील वारले. आईने जेमतेम एक एकर शेतात भाजीपाला पिकवून आपल्या मुलाला शिक्षण दिले. मुलानेही आईच्या कष्टाचे चीज करीत केंद्रीय लोकसेवा (यूपीएससी) आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करून ६७७ वा रँक मिळवली. यामुळे अधिकाऱ्यांची भूमी अशी ओळख असलेल्या वालसावंगीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.