लातूरमध्ये सोया पार्क उभारणार

हरी तुगावकर
गुरुवार, 28 जून 2018

लातूर जिल्हा व परिसरात सोबायीनचे उत्पादन व क्षेत्र मोठ्या प्रमाणात
वाढत आहे. येथे सोबायीनची मोठी बाजारपेठ आहे. सोयाबीनपासून तेल निर्मिती करणाऱ्या कंपन्याही येथे आहेत. सोयाबीनपासून बायप्रॉ़डक्ट तयार करण्याला येथे मोठा वाव आहे.

लातूर - लातूर जिल्ह्यात सोयाबीनचे वाढते क्षेत्र, वाढते उत्पादन, बाजारपेठ व उद्योग लक्षात घेता येथील एमआयडीसीत क्लस्टर डेव्हल्पमेंट अंतर्गत सोया पार्क उभी करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी येथे दिली.

शिवसेनेच्या मेळाव्यानिमित्ताने श्री. देसाई येथे आले होते. त्यांनी येथे
एमआयडीसीतील उद्योजकांची बैठक घेवून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच एमआयडीसीचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लातूर जिल्हा व परिसरात सोबायीनचे उत्पादन व क्षेत्र मोठ्या प्रमाणात
वाढत आहे. येथे सोबायीनची मोठी बाजारपेठ आहे. सोयाबीनपासून तेल निर्मिती करणाऱ्या कंपन्याही येथे आहेत. सोयाबीनपासून बायप्रॉ़डक्ट तयार करण्याला येथे मोठा वाव आहे. त्यात सोया बिस्कीट, सोया मिल्क, सोया चिज, सोया पनीर, सोया श्वास, जनावराचे खाद्य असे  अनेक उद्योग येथे उभारले जावू शकतात. हे लक्षात घेवून टेक्साटॉईल पार्कच्या धरतीवर येथे सोया पार्क उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील, या करीता उद्योजकांनी पुढे यावे. या करीता जमीन उपलब्ध करून दिली जाईल. तसेच ८० अनुदानावर त्या करीता लागणारे साहित्यही उपलब्ध करून दिले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

येथील अतिरिक्त एमआयडीसी टप्पा दोन, लातूर विमानतळ, घरणी येथील
भूसंपादनाचे प्रश्न मार्गी लावले जातील. तसेच अहमदपूर व उदगीर येथे नवीन एमआयडीसीसाठी जागा घेवून उद्योजकांना प्रोत्साहन दिले जाईल. येथील एमआयडीसी अंतर्गत रस्त्याची दुरुस्तीही लवकर करण्यात येईल अशी माहिती श्री. देसाई यांनी यावेळी दिली. यावेळी एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी महेश मेघमाळे यांनी पीपीटीद्वारे विभागाची माहिती दिली. यात त्यांनी येथे सोया पार्क होवू शकते ही संकल्पना मांडली. ती श्री. देसाई यांनी उचलून धरत त्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आश्वासन उद्योजकांना दिले. यावेळी उद्योजकांनीही काही समस्या मंत्र्यासमोर मांडल्या. यावेळी खासदार
चंद्रकांत खैरे उपस्थित होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Soya Park will be set up in Latur