झेडपी अध्यक्षांना विशेष आर्थिक अधिकार 

भास्कर बलखंडे
बुधवार, 25 मार्च 2020

कलम ५४/ २ अंतर्गत जिल्हा परिषद अध्यक्षांना या रुग्णांसाठी आर्थिक मदत ठेवण्याचा विशेष अधिकार अधिकार आहे . 

जालना - देशामध्ये कोरोना विषाणूबाबत प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी देशपातळीवर पातळीवर पर्यंत प्रयत्न सुरू आहेत. जालना जिल्ह्यातील डॉक्टर असोसिएशन रुग्णांना मदत करत आहेत. कलम ५४/ २ अंतर्गत जिल्हा परिषद अध्यक्षांना या रुग्णांसाठी आर्थिक मदत ठेवण्याचा विशेष अधिकार अधिकार आहे . 

जालना जिल्हा परिषद कोरोनावर नियंत्रण राखण्याबाबत गांभीर्याने हालचाली करत असल्याचे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनी सांगितले. 
राज्यातील ठिकठिकाणच्या शहरी भागातून परत आलेल्या ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहेत. जालना जिल्ह्यात महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून लोक कामासाठी गेलेले आहेत.

हेही वाचा : जालना जिल्ह्यात ३२ चेकपोस्ट

कोरोना रोगाच्या भितीने ते आपापल्या गावी परतत आहे. आपल्या गावी परतलेल्या नागरिकांची जिल्ह्यातील ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य तपासणी केली जात आहे. बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांनी आरोग्य केंद्रात जाऊन आरोग्याची तपासणी करावी असे आवाहनही केले. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, काळजी घ्यावी, संयम ठेवावा. नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात करण्यात येत असून याबाबत भिती बाळगू नये असे आवाहन करण्यात आले.

हेही वाचा : जालन्याच्या इतिहासात प्रथमच स्टील उद्योग बंद

जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना बाबत दक्ष राहावे त्यासाठी स्वतःचे संरक्षण स्वतः करण्यासाठी घरातच बसून राहावे.प्रशासनाला सहकार्य करावे.या रोगावर नियंत्रण राखण्यासाठी नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये व प्रशासनाला सहकार्य करावे त्यामुळे या रोगावर नियंत्रण राखता येईल असे आवाहन करण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special financial rights to zp president