Hingoli News : ‘स्पेशल राजकोट’ २६ जूनपर्यंत धावणार

अकोला ते पूर्णा रेल्वे मार्गाने स्पेशल राजकोट साप्ताहिक रेल्वे एक्स्प्रेस हिंगोलीतून २६ जूनपर्यंत धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.
Hingoli News
Hingoli News sakal

हिंगोली : अकोला ते पूर्णा रेल्वे मार्गाने स्पेशल राजकोट साप्ताहिक रेल्वे एक्स्प्रेस हिंगोलीतून २६ जूनपर्यंत धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे. रेल्वे क्रमांक ०९५७५ राजकोट येथून १५ एप्रिलपासून १.४५ वाजता निघून सुरेंद्रनगर, अहमदाबाद, वडोदरा, सुरत, नंदुरबार, जळगाव, भुसावळ, अकोला, वाशीम येथील थांब्यासह हिंगोली स्थानकावर १६ एप्रिलपासून दर मंगळवारी सकाळी १० वाजता २५ जूनपर्यंत धावेल.

Hingoli News
Latur Loksabha Constituency : बरे झाले तुम्ही निसटलात! ; अमित देशमुखांच्या गुगलीवर विक्रम काळे यांचे स्मित हास्य

पुढे वसमत, पूर्णा, नांदेड, धर्माबाद, बासर, निजामाबाद, काचीगुडा येथे थांबून मेहबूबनगर येथे दर मंगळवारी रात्री ७.३५ वाजता सुटून हिंगोली स्थानकावर १७ एप्रिलपासून दर बुधवारी सकाळी ८.३० वाजता २६ जूनपर्यंत आणि आलेल्या मार्गाने गुजरात राज्यातील राजकोट येथे पोचणार असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com