esakal | हिंगोली जिल्ह्यात कोविड लसीकरणाला उत्स्फुर्त प्रतिसाद
sakal

बोलून बातमी शोधा

Covid Vaccine

हिंगोली जिल्ह्यात कोविड लसीकरणाला उत्स्फुर्त प्रतिसाद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : जिल्ह्यात कोविड-१९ लसीकरण मोहिमेतंर्गत जिल्ह्यात कोविड लसीकरणाला उत्स्फुर्त प्रतिसाद देत आतापर्यंत चार लाख नागरिकांनी घेतली लस घेतली असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डाँ.शिवाजी पवार,जिल्हा शल्यचिकित्सक डाँ.राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा लसीकरण अधिकारी डाँ.सचिन भायेकर सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी कैलास शेळके यांच्या नियोजनाने संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

हेही वाचा: मराठा आरक्षणासाठी राजांना उतरावे लागते रस्त्यावर - ढोबळे

आज पर्यत जिल्ह्यात एकुण ३० नियमित व उपकेंद्र स्तरावर लोकसंख्येनुसार लसीकरण केंद्र स्थापन करुन तेथे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना कोविड-१९ हि लस देणे चालू आहे.

लसीकरण केंद्राच्या ठिकाणी नोंदणी कक्ष, पडताळणी कक्ष, लसीकरण कक्ष, निरीक्षण कक्ष प्रतिक्षालय कक्ष असे कक्ष स्थापन करण्यात आले या ठिकाणी शुद्ध पिण्याचे पाण्याची व्यवस्था करण्यात आली असुन अपंग व्यक्ती करीता व्हिलचेअर ची विशेष सुविधा करण्यात आली.लसीकरण केंद्रावर कोविशिल्ड लस,व को व्हँक्सीन लस असे दोन प्रकारच्या लसी देण्यात येतात.

हेही वाचा: पक्ष्यांनी सोडली अर्धवट घरटी अन् वाळू लागले वृक्ष

लसीकरण झाल्यावर संबंधित व्यक्तीस दुसऱ्या डोझ ची दिनांक असा मँसेज त्यांच्या मोबाईलवर येईल तसेच डोझ घेतल्या नंतर घ्यावयाची काळजी बाबत आरोग्य शिक्षण देण्यात येते,आज पर्यंत हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील चार लाख नागरिकांना पहिला व दुसरा डोझ देण्यात आला,कोविड १९ लसीकरण करण्यात आले आहे.कोरोना या विषाणुजन्य आजारावर कोविड लस हाच एक उपाय आहे कोविड लसीकरण मोहिमेची प्रसिद्धी जनजागृती हि सर्व विविध माध्यमातून तसेच कलापथक,बँनर,पोस्टर्स,पाम्पलेट,होर्डिंग,चित्ररथ इत्यादी माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात गावोगावी जनजागृती करणे चालू आहे.

तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना कोविड १९ लसीकरण जास्तीत जास्त नागरिकांनी करुन घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

loading image
go to top