Tuljapur : तुळजापूरनगरीत श्रीरामाच्या पाऊलखुणा

देवीने दृष्टांत दिल्याची आख्यायिका, घाटशीळ, रामवरदायिनी मंदिरे देतात साक्ष
tuljapur
tuljapur sakal

तुळजापूर : येथील तुळजाभवानी मातेच्या तीर्थक्षेत्रात प्रभू श्रीरामाच्या पाऊलखुणा आहेत. अयोध्येतील भव्य मंदिरात सोमवारी (ता.२२) श्रीरामाच्या मूर्तीच प्रतिष्ठापना होत आहे. यानिमित्त येथील पाऊलखुणांची चर्चा होत आहे.

प्रभू श्रीराम हे तुळजाभवानी मातेच्या शहरात, अर्थात तुळजापूरला आले होते. श्रीराम हे सीतेच्या शोधात निघाल्यानंतर तुळजाभवानी मातेने श्रीरामांना दृष्टांत दिला, अशी आख्यायिका आहे. तुळजाभवानी मातेसमोर उभे राहिल्यानंतर प्रभू श्रीरामांनी देवीस ‘तुकाई’असे संबोधले. तुळजाभवानी मातेने श्रीरामांना रस्ता दर्शविण्यासाठी घाटशीळ मंदिरावर शिळा ठेवली. त्यामुळे पुढे घाटशीळ हे मंदिर निर्माण झाले.

तुळजाभवानी मातेने श्रीरामांना वर दिला. त्यामुळे देवीला ‘रामवरदायिनी’ या नावाने संबोधले जाऊ लागले. आजही शहरातील शुक्रवारपेठेत रामवरदायिनीचे प्राचीन मंदिर आहे. रामवरदायिनी देवीची मूर्ती उत्कृष्ट स्थापत्याचा नमुना आहे. घाटशीळ मंदिर तसेच ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामांनी पाणी घेतले, त्यास रामझरा असे म्हटले जाते. हे नाव आजही प्रचलित आहे. याशिवाय तेथेच जवळच बारा ज्योतिर्लिंग हे महादेवाचे स्थान आहे. तुळजाभवानी मातेच्या मंदिरापासून घाटशीळ, रामवरदायिनी मंदिर तसेच रामझरा हा चार किलोमीटर परिसरातील भाग आहे.

tuljapur
Tuljapur : तुळजाभवानी मंदिरातील दागिने वितळवण्यास अखेर परवानगी; 204 किलो सोनं अन्...

नवरात्रात धार्मिक विधी

तुळजाभवानी मातेशी निगडित असणारे घाटशीळ येथील मंदिर प्राचीन आहे. मंदिरात एक शिळा आहे. त्यावर भाविक तेल अर्पण करतात. तसेच तुळजाभवानी मंदिरात होणाऱ्या सर्व धार्मिक विधींप्रमाणेच रामवरदायिनी मंदिरातही नवरत्रोत्सवात अनेक धार्मिक विधी होतात.

प्रभू श्रीरामचंद्र सीतेच्या शोधात निघाल्यानंतर तुळजाभवानीमातेने त्यांना वर दिला. तेव्हापासून रामवरदायिनी देवीचे स्थान आहे. रामवरदायिनी देवीची मूर्ती अष्टभुजा स्वरूपात आहे. या देवीच्या हातात सर्व आयुधे आहेत.

बाळासाहेब पुजारी, रामवरदायिनी देवीचे पुजारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com