
तालुकास्तरावरील सर्व शासकीय कार्यालयातील वाहनांची देखभाल व दुरुस्ती आगाराच्या यांत्रिक कर्मचाऱ्याकडे सोपविण्या संदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत त्यादृष्टीने कळमनुरी आगाराकडून सर्व शासकीय कार्यालयातील वाहनांची मोजदाद व माहिती संकलित करण्यात आली आहे.
कळमनुरी (जिल्हा हिंगोली) : कोरोना आजारामुळे मागील सहा महिन्यांपासून एसटी महामंडळाचे आर्थिक उत्पन्न डबघाईस आले आहे तोटा भरून काढण्यासाठी महामंडळाने बसमधुन मालवाहतूक सुरू करण्याच्या निर्णयाबरोबरच आता तालुकास्तरावरील सर्व शासकीय कार्यालयातील वाहनांची देखभाल व दुरुस्ती आगाराच्या यांत्रिक कर्मचाऱ्याकडे सोपविण्या संदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत. त्यादृष्टीने कळमनुरी आगाराकडून सर्व शासकीय कार्यालयातील वाहनांची मोजदाद व माहिती संकलित करण्यात आली आहे.
कोरोना आजारामुळे सहा महिन्यापासून बंद असलेली एसटी महामंडळाची सेवा मागील काही दिवसापासून शहरी व लांब पल्ल्याच्या भागात सुरू करण्यात आली आहे मात्र अजूनही ग्रामीण भागात बस सेवा सुरू करण्यासंदर्भात निर्णय होऊ शकला नाही आजाराच्या काळात बस सेवा बंद असल्यामुळे एस टी महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे सर्व कर्मचारी हातावर हात ठेवून बसले असतानाच महामंडळाकडून याही परिस्थितीत उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासंदर्भात प्रत्येक आगारा अंतर्गत काही बस गाड्यांचे मालवाहतूक करण्यासाठी बदल करून घेत एसटी महामंडळाकडून प्रथमच व्यापारी व नागरिकांना मालवाहतूक करण्यासाठी गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत.
हेही वाचा - मास्क न वापरल्याबद्दल मोजले ३५ लाख, औरंगाबादेत साडेपाच महिन्यांत सात हजार जणांकडून दंड वसूल -
त्या ठिकाणच्या स्थानिक बस आगारामध्ये कार्यरत असलेल्या
त्यानंतरही एसटी महामंडळाचे घटलेले उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत बसच्या माध्यमातून मालवाहतूक करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर राज्यातील प्रत्येक आगारात कार्यरत असलेल्या यांत्रिक कर्मचाऱ्यांकडून तालुका पातळीवरील सर्व शासकीय कार्यालयातील वाहनांची देखभाल दुरुस्ती करून देण्याचा निर्णय विचाराधीन आहे या पुढील काळात शासकीय कार्यालयातील वाहनाची दुरुस्ती त्या त्या ठिकाणच्या स्थानिक बस आगारामध्ये कार्यरत असलेल्या यांत्रिक कर्मचाऱ्यांकडून करण्यात येणार आहे यामुळेच एसटी महामंडळाला उत्पन्नाचा नवीन स्त्रोत निर्माण करून कर्मचाऱ्याच्या हातालाही काम देण्याचा प्रयत्न आहे.
कर्मचाऱ्याच्या हातालाही अधिकचे काम उपलब्ध होणार
यामधून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न काही अंशी सुटण्यास यास मदत मिळणार आहे यादृष्टीने एसटी महामंडळाच्या महासंचालकांनी यासंदर्भात प्रत्येक आगार प्रमुखांना पत्र देत तालुकास्तरावर असलेल्या प्रत्येक शासकीय कार्यालयातील वाहनांची माहिती संकलित करण्यासंदर्भात कळविले आहे त्या अनुषंगाने येथील आगारा मधील कर्मचाऱ्यांनी सर्व शासकीय व विभागाकडे असलेल्या वाहनांची माहिती संकलित केली आहे यामध्ये उपविभागीय कार्यालय, तहसील ,कृषी विभाग पोलीस स्टेशन, नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, सामाजिक वनीकरण विभाग आरोग्य विभाग, या कार्यालया अंतर्गत असलेल्या वाहनांची माहिती जमा केली आहे शासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर यापुढील काळात सर्व शासकीय कार्यालया अंतर्गत असलेल्या वाहनांची देखभाल दुरुस्ती एसटी महामंडळाच्या आगारा मधील यांत्रिक कर्मचाऱ्यांकडून केली जाणार आहे त्यामुळे एसटी आगाराला उत्पन्नाचा नवीन स्त्रोत मिळून कर्मचाऱ्याच्या हातालाही अधिकचे काम उपलब्ध होणार आहे.
संपादन - प्रल्हाद कांबळे
अभिजित बोरीकर (आगार प्रमुख) : वरिष्ठांकडून मिळालेल्या सूचनेप्रमाणे कळमनुरी आगारा मधील यांत्रिक कर्मचाऱ्यांनी तालुका अंतर्गत सर्व शासकीय कार्यालय व विभागाकडे असलेल्या वाहनांची माहिती संकलित करून ही माहिती परिवहन मंडळाच्या विभागीय यंत्र अभियंता यांच्याकडे पाठविण्यात आली आहे.