esakal | एसटी गोदामाचे धान्य घेऊन येते अन् गावाकरी कुतूहलाने पाहतात
sakal

बोलून बातमी शोधा

st news good carrier.jpg
  • कोरोनाने लालपरिला जीवंत केले.
  • माल वाहतूकीच्या कामामुळे गैरमार्गांना बसला आळा.  
  • चालकांना प्रशिक्षणाचा मात्र अभाव. 

एसटी गोदामाचे धान्य घेऊन येते अन् गावाकरी कुतूहलाने पाहतात

sakal_logo
By
विवेक पोतदार

जळकोट (लातूर) :  कोरोनामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एसटी माल वाहतूक सेवेतही दाखल झाली. गोदामातून धान्याची पोती भरून आता ही लालपरी जिल्ह्यातील गोदामासह खाजगी आडत व्यापारी दुकानातून माल वाहतुकीचे काम करत असल्याचे पाहून सामान्य नागरिक याकडे कुतूहलाने पाहत असल्याचे चित्र आहे. अर्थात गावात एसटी पुर्वी माणसांना घेऊन जात असे, आता तीच एसटी गावात गोदामाचा माल घेऊन आल्यावर लोक मोठ्या कुतूहलाने पाहतात.  

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

शहर असो की खेडी-पाडी वाडीवस्ती, तांड्यातून आता धान्य घेवून जाण्याला लातूर जिल्ह्याच्या आगारातून सुरुवात झाली. कोव्हिड-19 महामारीमुळे टाळेबंदीच्या काळात प्रवासी वाहतूक पुर्णपणे बंद असल्यामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळ तोट्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर संपुर्ण देश बंद होता. राज्यातील सर्व बसस्थानक प्रवाशाअभावी ओस पडले होते.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तोटा अन् बदलला निर्णय 

कोरोनाच्या सावटानंतर महामंडळाच्या कर्मचाऱ्याचे वेतन, बसेसची देखभाल आणि सांभाळ करण्यासाठी पैसा अपूरा पडू लागल्यामुळे आणि महामंडळ अगोदरच तोट्यात चालू असल्याकारणाने शेवटी नाईलाजाने मग एसटी महामंडळाने प्रवाशी वाहतूकी बरोबरच माल वाहतूक सेवेतून महामंडळाला आधार देण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यानुसार एस.टी. महामंडळाच्या बसेस कडून मिळेत तो माल वाहतुक सुरु करण्यात आली आहे. बसवरील टप कापुन त्यावर जाड ताडपत्री टाकण्यात आली. बसमध्ये प्रवाशी चढण्याच्या पायऱ्या पासून चालकाना प्रवेश दिला असून वाहकाच्या बसण्याच्या शीट जवळून पुर्णपणे जाड पत्र्याने बंद करण्यात आलेला आहे. त्याच बरोबर आतील भागातील सर्व बाकडे काढून पुर्ण भाग मोकळा करण्यात आला आहे. पाठीमागूनच माल भरण्यासाठी व उतरविण्यासाठी दार सोडण्यात आले आहे.

आता एफसीआय गोदामात लालपरीत शासकीय गहू, तांदूळ भरला जात आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्‍यातील गोदामात आता बसमधून वाहतूक केली जात आहे. महामंडळाच्या बसमधून शासकीय मालाची वाहतूक सुरु झाल्यामुळे होणाऱ्या गैरप्रकाराला निश्चितच आळा बसेल यात शंकाच नाही.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

चालकाना प्रशिक्षणाचा अभाव?

महामंडळाच्या चालकाना  पंचवीस वर्ष बस चालवण्याचा प्रदिर्घ अनुभव जरी असला तरी  किरकोळ अपघात झाले. तरी चालकांना प्रशिक्षण दिले जाते. मात्र महामंडळाकडून अद्याप पर्यत कुठलेच प्रशिक्षण न देताच माल वाहतुकीचे स्टेरिंग हातात देण्यात आले आहे.

चालकांची काळजी घेणे आवश्यक 
मधूमेह, उच्च रक्तदाब सारख्या विविध आजाराने ग्रस्त असलेल्या चालकाचे काय? कौटुबिक जबाबदारी आणि ताणतणावातच सदैव मनामध्ये घेऊन कार्यरत असणार्या चालकाच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

हमाल गुदमरल्यासारखे

बस चारही बाजूने हवाबंद असल्यामुळे माल चडवणे व उतरविताना हमालाला गुदमरल्यासारखे होत आहे. त्याचबरोबर टपाची उंची कमी असल्यामुळे हमालास बस मध्ये पोते चढविणे व उतरविताना कमी उंची मुळे टपाला पोते लागत असून यांचा त्रास हमालाला होत आहे. आमचा वेळ वाया जात असल्याचे हमाल बोलताना म्हणाले.


वाढीव भत्ता मिळावा 
माल उतरवल्यानंतर दुसरा माल मिळेपर्यत थांबावे लागते.
 यामुळे रात्र आणि दिवसाचा वाढीव भत्ता मिळण्याची गरज असल्याचे चालक वर्गातून बोलले जात आहे


कोरोनाच्या काळात वेळेवर नाश्ता, चहा, आणि जेवणाची सोय होत नाही. अपवादात्मक परिस्थिती मध्ये आम्हाला आंघोळ देखील करता येत नाही. - -अंकुश चव्हाण चालक, माजलगाव आगार
 

(संपादन-प्रताप अवचार)